किशोर कुमार यांचे आजही चर्चेतले `ते` ५ किस्से, पण `या` ईच्छा अपूर्णच राहिल्या
मधुबालासोबत लग्न करायची ईच्छा असल्याचं गंमतीत म्हटलं होतं
मुंबई : चित्रपटविश्वातील दिग्गज गायक किशोर कुमार आपल्या कारकीर्दीमध्ये त्यांनी सर्व भाषांमध्ये 1500 हून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे. गायक, संगीतकार, अभिनेता, निर्माता, लेखक, असे सर्वगुण संपन्न ते होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी गायन जगात कधीही कसलंच संगीत प्रशिक्षण घेतलं नव्हतं. खांडवा शहरातील रेल्वे स्टेशनसमोर गांगुली निवासमध्ये त्यांचा जन्म झाला. १३ ऑक्टोबर १९८७मध्ये किशोर कुमाप यांनी अखेरचा श्वास घेतला. जाणून घेवुयात त्यांच्या आयुष्यातील किस्से
किस्सा-१
किशोर यांना आपलं शहर खांडवावर खूप प्रेम होतं. जेव्हा जेव्हा किशोर स्टेज शो करायचे तेव्हा- तेव्हा ते म्हणायचे मेरे नाना नानियों, मेरे दादा-दादियों, मेरे भाई- बेहनो तुम्हा सगळ्यांना खंडवेवाले किशोर कुमार यांचा नमस्कार असंच ऐके दिवशी त्यांनी त्यांची दुसरी पत्नी मधुबालासोबत लग्न करायची ईच्छा असल्याचं गंमतीत म्हटलं होतं
किस्सा- २
किशोर दा यांना त्यांचं शहर खांडवा खुप जवळचं होतं.त्यांची एक ईच्छा पूर्ण झाली. मात्र अशाच अनेक ईच्छा त्यांच्या होत्या ज्या ते पूर्ण करु शकले नाही. ते म्हणायचे मी सिनेजगातून निरोप घेतल्यावर खांडवामध्ये स्थायिक होणार आणि रोज दूध आणि जिलेबी खाणार. मात्र ही त्यांची ईच्छा अधूरीच राहिली
किस्सा- ३
किशोर दा एकदा मुंबईमध्ये आपल्या मोठ्या भावाच्या घरी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आले होते. अचानक ऐकेदिवशी संगीतकार सचिन देव वर्मा तिथे पोहचले. गप्पा गोष्टींसाठी आलेले सचिन यांनी बसल्याजागी कुणाचा तरी गातानाचा आवाज ऐकला. आणि अशोक कुमार यांना विचारलं कोण गातं आहे घरात? यावंर अशोक कुमार म्हणाले, माझा लहान भाऊ किशोर... त्यांचा आवज ते थोडावेळ ऐकतचं राहिले. पंचम पहिल्यांदाच त्यांचा आवाज ऐकत होते. हे तेच होते यानंतर किशोर कुमार यांना त्यांनी संगीत क्षेत्रात आणंल होतं
किस्सा- ४
किशोर कुमार यांचे पैशांचे किस्सेदेखी बरेच आहेत. किशोर दा आपले पैसे कधीच सोडत नसत. 'प्यार किए जा'मध्ये कॉमेडियन मेहमूदने किशोर दा, शशि कपूर आणि ओमप्रकाशपेक्षा जास्त पैसे वसूल करुन घेतले होते. किशोर यांना या गोष्टीचा राग आला आणि मग त्यांनी पडोसन सिनेमाच्यावेळी त्याच्या दुप्पट फि आकारली
किस्सा- ५
एकदा नागरीक शास्त्र पीरियडमध्ये किशोर आपल्या वर्गातल्या टेबलला तबल्याप्रमाणे वाजवत होते. तेव्हा प्राध्यापकांनी त्यांना फटकेही दिले होते आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची सूचना दिली होती, ते म्हणाले, ''कारण गाणं वाजवणं तेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यात अजिबात कामी येणार नाही''. यावर किशोर यांनी आपल्या शिक्षकाला हसत हसत उत्तर दिलं की, ''गाणं वाजवून आपलं आयुष्य एक दिवस नक्की बनेल'''