मुंबई : खारी बिस्कीट' म्हणजे नेमके काय? हा प्रश्न अनेकांना पडला होता. खारी बिस्कीट ही चिमुरड्या भावंडांची जोडगोळी आहे. खारीसाठी बिस्कीट आणि बिस्कीटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारीची इच्छा म्हणजे आठ वर्षांच्या बिनधास्त बिस्किटसाठी राजकुमारीचा हुकूम. खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. तिनं असंच एक स्वप्न पाहिलंय वर्ल्डकपला जाण्याचं !


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच रिलीज झालेल्या फिल्मच्या ट्रेलर मधून आपल्याला हे पाहायला मिळतं. झी स्टुडिओज आणि ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन यांचा निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या १ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


बिस्कीटची भूमिका आदर्श कदमने केली आहे तर खारी वेदश्री खाडिलकर हिने साकारली आहे. याशिवाय सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते या बच्चेकंपनी सोबत नंदिता पाटकर, सुयश झुंझुरके आणि संजय नार्वेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.