मुंबई : श्रीदेवीच्या निधनाचा सर्वात जास्त धक्का बसला असेल तो तिच्या मुली जान्हवी आणि खुशी कपूरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हळूहळू दोघीही आपल्या आयुष्यात रुळायल्या लागल्या आहेत. जान्हवीने आपल्या सिनेमाची शुटींग सुरू केली. पण तिची लहान बहिण खुशी संदर्भात एक वृत्त समोर आलयं.


मॉडेलिंगमध्ये करियर


जान्हवी कपूरची लहान बहिण खुशी कपूरला सिनेमात रुची नाही. सिनेमाऐवजी ती मॉडेलिंगमध्ये करियर करु इच्छिते.


या संदर्भातील वृत्त सगळीकडे पाहायला मिळत आहे. हे वृत्त खरे मानले तर खुशी ला इंटरनॅशनल मॉडेलिंग खूप आवडते.


अभ्यासाकडे लक्ष 


खुशी सध्या १७ वर्षाची असून आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रीत करतेय. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मॉडेलिंगची ट्रेनिंग घेण्यासाठी ती परदेशी जाईल. 


खुशीला नवनवे कपडे आणि परिवारातील पार्ट्यांमध्ये किंवा  सुट्टी एन्जॉय करताना पाहिलं गेलयं.