मुंबई : सध्या लग्नाचा मौसम सुरू आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटीदेखील विवाहबंधनामध्ये अडकत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी विनित बोंडे विवाहबंधनात अडकला आता त्यापाठोपाठ आज खुशबू तावडे आणि संग्राम साळवी ही जोडीदेखील विवाहबंधनात अडकली आहे. 


छोट्या पडद्यावर हीट  


खुशबू तावडे आणि संग्राम साळवी हे दोघेही छोट्या पडद्याच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आले आहे. संग्राम साळवी 'देवयानी','सरस्वती' अशा मालिकांमध्ये आणि प्रामुख्याने रावडी, खलनायकी भूमिकेत दिसला. तर खुशबूदेखील मराठी आणि हिंदी मालिकांमधून घराघरात पोहचली आहे.   संग्राम साळवी आणि खुशबू तावडे चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेल्या सांजबहरमध्ये झळकले होते.  


 संग्रामने शेअर केला खास फोटो  


 नवरदेव संग्राम साळवीनेदेखील आज खुशबू आणि त्याचा हळदीचा खास फोटो शेअर केला आहे.  'झालं..' या कॅप्शनमध्ये संग्रामने त्याच्या लग्नाची खूषखबर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.