मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीची बहीण इशिता हिचे नुकतेच लग्न झाले. कियाराने बहीण इशिताच्या लग्नात धम्माल-मस्ती केली आणि मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यात कुटुंबासोबत वेळ घालवताना लग्नसमारंभाचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कियारा तिच्या बहिणीच्या लग्नात डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीने यावेळी बोल्ड लूक केला आहे. तिच्या स्टाईलवर चाहते फिदा झाले आहेत. गुलाबी रंगाच्या स्लिम ड्रेसमध्ये कियाराने तिच्या बहिणीसाठी खास परफॉर्मन्स केला.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कियाराचा बोल्ड अंदाज यावेळी चांगलाच भाव खाऊन गेला. आपल्या मैत्रिणींसोबत मिळून यावेळी कियाराने डान्स केला.