मुंबई : कियारा अडवाणी ही अशी अभिनेत्री आहे. जी दररोज नवीन स्टाईलमध्ये आणि प्रत्येक क्षणाला अधिक सुंदर दिसते. शुक्रवारी ही अभिनेत्री पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात दिसली आणि यावेळीही तिच्या स्टाईलने तिने चाहत्यांची मन चोरली. पण स्टायलिश आउटफिटमध्ये दिसणाऱ्या कियाराच्या स्टाईलपेक्षा तिच्या जोडीदाराचीच जास्त चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कार्तिकला सोडून वरुणसोबत कियाराची मस्ती
खरंतक, असं झालं की आतापर्यंत कियारा अभिनेता कार्तिक आर्यनसोबत भूल भुलैयाचं प्रमोशन करत होती. दोघंही सर्वत्र एकत्र दिसत होते आणि त्यांची मजा चाहत्यांना खूप आवडली पण रातोरात कियाराने तिचा जोडीदार बदलला. आणि हे पाहून चाहते थक्क झाले आहेत. तो जोडीदार म्हणजे वरुण धवन आणि याला कारण आहे त्याचा आगामी 'जुग जुग जिओ' हा चित्रपट. भूल भुलैयानंतर आता कियाराने तिच्या जुग जुग जियो या चित्रपटाचं प्रमोशन सुरू केलं आहे. त्यामुळे शुक्रवारी ती कार्तिक आर्यनऐवजी वरुण धवनसोबत मस्ती करताना दिसली.


वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांचा हा चित्रपट २४ जूनला प्रदर्शित होत आहे. सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला महिनाभराहून अधिक कालावधी शिल्लक असला तरी आतापासूनच स्टार्सनी प्रमोशनला सुरुवात केली आहे. या लीड पेअरशिवाय नीतू कपूर आणि अनिल कपूर देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लग्नाभोवती फिरणारा हा कौटुंबिक चित्रपट आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या या चित्रपटाच्या कथेबद्दल फारशी माहिती नसली तरी अतिशय अनोख्या पद्धतीने या सिनेमाचं प्रमोशन सुरू करण्यात आलं आहे. एक दिवस आधी, चित्रपटाच्या कलाकारांनी सोशल मीडियावर लग्नाच्या फोटोंबद्दल एक मजेदार प्रश्न घेऊन चित्रपटाचं प्रमोशन करण्यास सुरुवात केली.