मुंबई : कारगिल युद्धातील नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित 'शेर शाह' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विक्रमचे शौर्य दाखवण्यात आले. तसेच, चित्रपटाने रुपेरी पडद्यावर कॅप्टन आणि त्याची मैत्रीण डिंपल चीमा यांची लव्हस्टोरी देखील दाखवली आहे. आता एका मुलाखतीदरम्यान डिंपलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कियारा अडवाणीने चित्रपटाशी संबंधित काही खास गोष्टीचा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कियाराला अश्रू अनावर
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कियारा काही गोष्टी ऐकून रडली होती. कियारा म्हणाली की, मी चित्रपटानंतर डिंपलला मेसेज केला होता. हा त्यांच्यासाठी एक भावनिक चित्रपट असावा. कियाराने देखील डिंपलच्या पर्सनल गोष्टीचा आदर करत त्यांच्यासोबत जास्त संवाद सादला नाही.


अभिनेत्री पुढे म्हणाली की, कॅप्टनच्या कुटुंबाने तिला सांगितले की ती चित्रपटात अगदी डिंपलसारखी दिसत होती. तिचे हे शब्द ऐकून कियारा रडली.


कियाराला अनेक गोष्टी सांगितल्या
 कियारा म्हणाली की, डिंपलला अभिमान वाटायला हवा की लोकांना 'शेरशाह' ची कथा आवडत आहे. कियाराच्या मते, जेव्हा ती पहिल्यांदा डिंपलला भेटली, तेव्हा चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले नव्हते. त्यामुळे त्यांचे संभाषण हे सर्वात महत्त्वाचे भावनिक पैलू होते. डिंपलने अनेक गोष्टी कियाराला सांगितल्या, ज्याची चांगलीच मदत चित्रपट करताना कियाराला झाली. दोघांची ही भेट विक्रमचा जुळा भाऊ विशाल बत्रा यांनी निश्चित केली होती.