Kiara Advani Grand Entry At Her Wedding : अखेर बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा (Kiara Advani) शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, आता कियारानं सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील काही अनसीन क्षणांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कियारानं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत कियारा सुरुवातीला लग्न मंडपात कशी एन्ट्री करते हे पाहायला मिळत आहे. इतकंच काय तर कियारानं नाचत एन्ट्री केली. हे पाहता सिद्धार्थ तिला वेळ जात असल्याचा इशारा करत त्याच्या घड्याळाकडे पाहतो. त्यानंतर त्यांचा वरमाला घालण्याचा कार्यक्रम पारपडतो यावेळी ते दोघे किती सुंदर दिसतात हे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत कियारानं 07.02.23 त्यांच्या लग्नाची तारिख कॅप्शन म्हणून दिली आहे. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कियारानं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यावर अनेकांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कियारानं शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमेंट करत सगळ्यात जास्त सुंदर. नेहा धुपिया म्हणाली, सुंदर कियारा आणि सुंदर सिद्धार्थ. तिसरा नेटकरी म्हणाला, स्वप्नांसारखंच आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या व्हिडीओवर कमेंट करत सेलिब्रिटींपासून नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


कियारा आणि सिद्धार्थ हे राजस्थान जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या आहेत. सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनी 2021 साली प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' (Shershaah) या चित्रपटात एकत्र काम केलं होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ हे सगळीकडे एकत्र दिसले. 


हेही वाचा : Pathaan च्या यशानंतर आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!


या दोघांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ लवकरच, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' (Indian Police Force) या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, कियाराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे