मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री किआरा अडवाणी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कियारा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमी कियारानं तेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्या सुंदरतेचे नेटकरी घायल होतात. आज कियाराचा वाढदिवस आहे. किआराच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या ब्युटी टिप्सविषयी जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोल्ड आणि हॉटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या कियाराच्या ब्युटी टिप्स देखील नेहमीच चर्चेत असतात. कोट्यवधीची कमाई करणाऱ्या कियाराच्या ब्युटी टिप्स मात्र खूपच साध्या आणि सोप्या आहेत. कोट्यावधी आणि ग्लॅमरस ब्युटी प्रॉडक्ट्सच्या जाहिरात करणारी कियारा मात्र ही स्वस्ताले उपाय मेकअपसाठी वापरते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ती तिच्या चेहऱ्यावरील ग्लोसाठी काय करते असा प्रश्न तिचे चाहते आणि नेटकऱ्यांना नेहमीच पडतो. अशावेळी कियारानं त्यांना काही उपाय सांगितले आहेत.



ग्लोईंग स्किनसाठी कियारा नेहमीचं घरगुती उपाय करत असल्याचे सांगण्यात येते. याविषयी कियारानं एका मुलाखतीत सांगितलं होतं,'मी कोणत्या ही प्रकारच्या महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत नाही. मी बऱ्याचदा टोमॅटोचा वापर करते. त्याची पेस्ट चेहऱ्याला लावते. त्यामुळे चेहऱ्याला ग्लो येतो, असा माझा अनुभव आहे.' कियाराचा हा उपाय आपण सगळेच करु शकतो. 


कियारा म्हणते, आपल्या सुंदरतेचं रहस्य हे किचनमध्येच दडलं आहे. मात्र आपल्याला त्याविषयी फारशी माहिती नाही. आपण त्याचा कधीही गांभीर्यानं विचारही करत नाही. सुंदर दिसणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे घरगुती उपाय देखील अनेकदा त्यावर रामबाण इलाज असतात. तुम्ही सुंदर दिसण्यासाठी जेवढी मेहनत घेता त्याची तेवढी गरज नाही. हे लक्षात घ्या. असं सांगायला किआरा विसरली नाही. 


नुकतीच किआरा भुलभुलैय्या 2 या चित्रपटात दिसली. बॉलीवूडमधील यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची देखील मोठी पसंती मिळाली होती. कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली.