Kiara Advani Viral Video Before Wedding: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या ठिकाणाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. कियारा आणि सिद्धार्थ हे राजस्थान जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये सप्तपदी घेणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कियारा लग्नासाठी जैसलमेरला निघाल्याचे म्हटले जात आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कियाराचा एअरपोर्टवरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मानव मंगलानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरनं शेअर केला आहे. या व्हिडीओत कियारा तिच्या कुटुंबासोबत मुंबई विमानतळावर गाडीनं पोहोचल्याचे दिसत आहे. त्यानंतर गाडीतून उतरल्यानंतर कियारा पापाराझींना हात दाखवत हाय करताना दिसते. यावेळी कियाराचा नो मेकअप लूक दिसत आहे. इतकंच काय तर तिच्या चेहऱ्यावर असणारी खुशी सगळ्यांना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या ज्या चर्चा सुरु होत्या. त्या सगळ्या खऱ्या असल्याचे म्हटले जात असून त्याचे कारण कियाराचा हा व्हिडीओ आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, संगीत समारंभाच्या रात्री कियारा आणि सिद्धार्थ काला चष्मा, बिजली, रंगासारी, डिस्को दिवाने या गाण्यांवर डान्स करणार आहेत.  सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Sidharth Malhotra Marriage Date) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Updates) अशा अनेक गोष्टी त्यांचे चाहते सर्च करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, हे दोघे 6 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत.


सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनी 2021 साली प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह (Shershaah) या चित्रपटात एकत्र काम केलं होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ हे सगळीकडे एकत्र दिसले. 


हेही वाचा : Sidharth- Kiara च्या लग्नाआधी Karan Johar कडून मोठं सिक्रेट समोर; हे काय बोलून गेला तो?


या दोघांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ लवकरच, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' (Indian Police Force) या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, कियाराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे