मुंबई : अमेरिकन रिएलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन तिच्या ग्लॅमरस फोटो, लूक आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. किम गेल्या काही महिन्यांपासून कॉमेडियन आणि अभिनेता पीट डेव्हिडसनला डेट करत आहे. दोघांचं सोशल मीडियावर व्हेकेशनचे अनेक फोटो पाहायला मिळाले. आता अशा बातम्या येत आहेत की, किम कार्दशियन आणि पीट डेव्हिडसनचे ब्रेकअप झालं आहे. दोघं 9 महिने एकमेकांना डेट करत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन न्यूज पोर्टल्स आणि मासिकांनी त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, किम कार्दशियन आणि पीट डेव्हिडसन या आठवड्यात वेगळे झाले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या जोडीने एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. त्यादरम्यान किम 'SLN' शो होस्ट करत होती. पीटने या कॉमेडी स्केच शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला.


पती कान्ये वेस्टसोबत घटस्फोटाचा खटलाही सुरू आहे.
41 वर्षीय किम कार्दशियनचा रॅपर कान्ये वेस्टसोबत घटस्फोटाचा खटला सुरू आहे. जो अंतिम टप्प्यात आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर किमने 28 वर्षीय पीट डेव्हिडसनला डेट करायला सुरुवात केली. दोघंही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसले. किमने पीटसोबतचे तिचे सर्व व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


किम कार्दशियनने आतापर्यंत 3 लग्न केली आहेत. तिसर्‍या पतीसोबत तिचा घटस्फोटही आता होणार आहे. किम कार्दशियनने 2014 मध्ये कान्ये वेस्टशी लग्न केलं. दोघांना चार मुलं आहेत. कान्येसोबत किमच्या विभक्त झाल्याच्या बातम्याही बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. 2020 मध्येच दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. ज्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.