Kim Kardashian ला घटस्फोट दिल्याच्या 2 महिन्यांतच Kanye West चं आणखी एक लग्न
Kim Kardashian च्या तिसऱ्या पतीनं तिला घटस्फोट दिल्याच्या 2 महिन्यांनंतर दुसरं लग्न केलं आहे.
Kim Kardashian Kanye West Divorce : गेल्या वर्षी अमेरिकन स्टार (Amrican star) आणि इंन्फ्लूएन्सर किम कार्दशियन (Kim Kardashian) आणि तिचा Ex Husband रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West) यांचा घटस्फोटा झाला. आता घटस्फोटाच्या दोन आठवड्यांनंतर कान्ये वेस्टनं डिझायनर बियान्का सेन्सीशी लग्न केल्याचे म्हटले जात आहे. बियान्का ही कान्येच्या फॅशन ब्रँड Yeezy साठी त्याच्यासोबत काम करते.
डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, कान्यनं बियान्का सेन्सीशी लग्न केले आहे. या आधी अशी माहिती समोर आली होती की कान्ये आणि बियांका एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी नक्की बियांका आणि कान्ये वेस्ट हे रिलेशनशिपमध्ये आहेत का ही माहिती समोर आली नव्हती. मात्र, त्यांना बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले होते. मात्र, नक्की ते रिलेशनशिपमध्ये आहेत का हा प्रश्न सुटत नव्हता. यामुळे बियांका ही एका मिस्ट्री वूमनसारखी होती.
हेही वाचा : एकाहून एक इंटिमेट सीन देणाऱ्या Actress चा साखरपुडा; फोटो शेअर करत म्हणाली...
दरम्यान, किम कार्दशियन आणि कान्ये वेस्टनं लग्नाच्या सात वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी किमनं घटस्फोटाच्या वेळी चार मुलांच्या संयुक्त कस्टडीची मागणी केली होती. रिपोर्ट्सनुसार, कान्ये वेस्ट हा बायपोलर डिसऑर्डरनं त्रस्त होता. त्यामुळे त्याच्यात आणि किममध्ये मतभेद होऊ लागले होते.
लाखो रुपयांचा करार... (Kim Kardashian kanye west settlement)
किम आणि कान्ये यांच्या घटस्फोटात (Divorce) करण्यात आलेल्या करारानुसार आणि आर्थिक व्यवहारानुसार कान्येनं किमला दर महिन्याला 2 लाख युएस डॉलर्स इतकी मोठी रक्कम मुलांच्या संगोपनासाठी देणं अपेक्षित असेल. शिवाय मुलांच्या शिक्षणाचा अर्धा खर्चसुद्धा त्याचीच जबाबदारी असणार आहे. यामध्ये शिकवणी आणि मुलांच्या सुरक्षिततेवर खर्च होणाऱ्या रकमेचाही समावेश असेल.
घटस्फोटांच्या कागदपत्रांमध्ये आणखी एक अट...
कायदेशीररित्या करण्यात आलेल्या या घटस्फोटामध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नमूद करण्यात आली आहे. किम किंवा कान्ये केव्हाही या दोघांपैकी कोणीही चारपैकी कोणत्याही एका मुलाबाबत वादग्रस्त परिस्थितीत सापडले तर, त्या दोघांनीही यावर तोडगा काढणं अपेक्षित असेल. दोघांपैकी कुणा एकाचाही अपेक्षित परिस्थितीत वाटा नसल्यास जो तिथं असेल, त्याच्याकडे निर्णय़ घेण्याची ताकद असेल.
2011 मध्ये सुरु झालेल्या प्रवासाला पूर्णविराम (Kim Kardashian ex husbands)
किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट यांच्या नात्याची सुरुवात 2011 मध्ये झाली होती. 2013 मध्ये त्यांनी या नात्यात आपल्या मुलीचं स्वागत केलं आणि 2014 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. कान्येपासून विभक्त होऊन आता घटस्फोटही झाल्यामुळं हा किमचा तिसरा घटस्फोट ठरला आहे. याआधी तिनं Kris Humpheries याच्याशी 2011 मध्ये लग्न केलं होतं. अवघ्या 72 दिवसांतच तिनं या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी ती Damon Thomas याच्यासोबत 2000 ते 2004 या काळात वैवाहिक नात्यात होती.