किरण मानेंना मालिकेतून काढून टाकल्यावर चित्रपटात वर्णी
माऊचे बाबा एका नव्या भूमिकेत
मुंबई : स्टार प्रवाह या वाहिनीवरील मालिका 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) मालिकेतून चुकीच्या वर्तणुकीचे कारण देत अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना काढण्यात आलं. सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं.
किरण माने यांना तडकाफडकी काढून टाकल्यामुळे अनेक दिवस हा मुदा चर्चेत होता. असं असताना आता किरण माने यांची सिनेमात वर्णी लागली आहे.
किरण माने यांनी नवी फेसबुक पोस्ट करत मालिकेतून काढल्यानंतर 'रावरंभा' (ravrambha )या चित्रपटासाठी विचारणा झाली असून सध्या याचे चित्रीकरण सुरु असल्याचा माहिती दिली आहे.
रावरंभा हा सिनेमा संजय जाधव दिग्दर्शित हा सिनेमा ऐतिहासिक प्रेमकहाणीवर आधारित आहे. या सिनेमात अनेक कलाकारण असून यामध्ये किरण माने यांचीही वर्णी लागली आहे.
किरण माने यांच्यासोबत नेमकं काय झालं? राजकीय भूमिका मांडली म्हणून आपल्याला काहीही पूर्व सूचना न देता मालिकेत काढून टाकण्यात आल्याचा आरोप निर्मात्यांवर केला होता. त्यांनतर पत्रक जाहीर करत वाहिनीने किरण माने गैरवर्तवणूक करत होते वारंवार सांगूनही त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं होतं