मुंबई : सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेणं अभिनेते किरण माने यांना चांगलचं भोवलं आहे. सोशल मिडीयावर राजकारणाविषयी मत मांडल्यामुळे  निर्मात्यांनी माने यांना 'मुलगी झाली हो' मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. सध्या या प्रकरणाची चर्चा वाऱ्यासारखी पसरत आहे. महत्त्वाचं म्हणजे किरण माने आता शरद पवार यांना भेटणार अशी चर्चा रंगत आहे. यामुळे हे प्रकरण अधिक तापण्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरण माने आज मुंबईतील सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांना भेटणार असल्याचं समजत आहे. एवढंच नाहीत मालिकेच्या निर्मात्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देखील दिलं आहे.


'मुलगी झाली हो' मालिकेचे निर्माते म्हणाले, 'किरण माने यांना राजकीय भूमिका घेतल्यामुळे काढण्यात आलेले नाही, तर काही व्यवसायिक कारणांमुळे त्यांना काढल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे...'


पण एक मुलाखतीमध्ये माने यांनी या संदर्भात खुलासा करत राजकीय घटनांवर भूमिका मांडल्यामुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.


किरण माने यांनी गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. 


आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिलेत. किरण मानेंनी एका दैनिकाशी बोलताना, “होय, मला मालिकेतून काढून टाकले आहे. असं सांगितलं.