Kiran Mane in Villains Role :  पहिल्या झलकपासून ते आतापर्यंत हळू-हळू एक पैलू, पात्रं उलगडणारी ‘सन मराठी’ची ‘तिकळी’ या मालिकेतील रहस्य काय, नेमका कशाचा उलगडा या मालिकेतून होणार आहे याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. 1जुलैपासून ‘तिकळी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेच्या प्रोमोंमधून  अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर, पूजा ठोंबरे, अभिनेता पार्थ घाटगे या मालिकेत विशेष भूमिका साकारणार आहेत हे प्रेक्षकांना कळलं आहे. पण संपूर्णच गोष्ट रहस्याने भरलेली असताना एक पण नकारात्मक पात्रं नसणार हे कदापि शक्य नाही. मालिका सुरु झाल्यावर हळू-हळू जसं रहस्य उलगडत जाईल तसंच मालिका प्रदर्शित होईपर्यंत या मालिकेत अजून कोण कलाकार आहेत याचा ही उलगडा ‘सन मराठी’ करत राहील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ज्या व्यक्तीचा सगळीकडे आवाज आहे आणि ‘तिकळी’ मालिकेच्या विषयासारखाच त्या व्यक्तीचा विषय देखील गंभीर आहे असा कलाकार या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून अभिनेते किरण माने हे आहेत. किरण माने ‘तिकळी’मध्ये ‘बाबाराव’ हे पात्रं साकारणार आहेत. बाबाराव हा गावचा खोत ज्याचा गावावर वचक आहे. बाबारावचा शब्द हा शेवटचा शब्द असा रुबाब घेऊन बाबाराव गावात राहतोय. पण बाबाराव आणि तिकळी यांचा नेमका संबंध काय किंवा त्यांचं समीकरण नेमकं कुठे जुळतंय हे प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच कळेल.  या मालिकेच्या ट्रेलर आणि टीझरनं लोकांना वेड लावलंय. सगळीकडे याच टीझरची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता नक्की काय होणार हे आपल्याला मालिका प्रदर्शित झाल्यानंतर पाहायला मिळेल. त्यामुळे आता दोन दिवस आणि दोन दिवसानंतर ही सगळं रहस्य उलगडणार आहे.  


हेही वीची : 'बनवा बनवी' फेम 'शांतनु'ची पत्नी आणि मुलांना पाहिलंत का?


‘तिकळी’ मालिकेत बाबाराव उर्फ किरण मानेचा दरारा पाहून उडणार सर्वांचा थरकाप. प्रेक्षक जितका बाबारावला भेटायला आतुर असेल तितकाच बाबाराव सुध्दा त्याचा रुबाब आणि गावात असलेला त्याला दरारा प्रेक्षकांसमोर मिरवायला आतुर असेल. त्यामुळे नक्की पाहा ‘तिकळी’ ही मालिका 1 जुलै पासून सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त आपल्या ‘सन मराठी’वर.