मुंबई : अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी किरण रावचा १३ वर्षांनंतर सिनेमा येत आहे. तिचा अपकमिंग कॉमेडी ड्रामा सिनेमा लापता लेडिज लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमात नव-नवीन चेहरे समोर येणार आहे. या सिनेमातून दिग्दर्शक म्हणून कमबॅक करणार आहे. ज्यासाठी खूप एक्साईटेड आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने खुलासा केला की,  तिचा एक्स पती आमिर खानला रवी किशनच्या रोलसाठी ऑडिशन दिलं होतं. त्याचं ऑडिशन दिलं होतं. त्याचं ऑडिशन पाहिल्यानंतर किरणला वाटलं रवीच हा रोल आमिरपेक्षा चांगला निभवू शकतो. तोच या रोलसाठी आमिरपेक्षा परफेक्ट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा किरण रावला विचारलं गेलं की, आमिर खान 'लापता लेडीज' या सिनेमात महत्वाची भूमिका साकारत आहे का? तेव्हा ती म्हणाली, तिच्यात आणि आमिरमध्ये यावरुन बरंच बोलणं झालं होतं. त्याने रवी किशनचं निभवत असलेलं पात्र मनोहरची भूमिका करावी की नाही. एवढंच नाहीतर आमिरने या भूमिकेसाठी ऑडिशनही दिलं होतं. तो ही या भूमिकेसाठी चांगलाच होता मात्र  जेव्हा रवी किशनने ऑडिशन दिलं तेव्हा आमिरनेही मान्य केलं की त्याच्यापेक्षा या भूमिकेसाठी रवी किशन योग्य आहे.


 आमिर खानपेक्षा रवि किशनला पसंती
किरण रावने द वीक ला दिलेल्या मुलाखतीमध्ये  सांगितलं की, ''मला वाटतं की रवी किशनच्या अभिनयात जादू आहे.  या भूमिकेसाठी त्याने जीव ओतून काम केलं आहे. त्याच्या अभिनयातून तो तुम्हाला हैराण करतो. आमिर जेव्हा एखाद्या भूमिकेत असतो तेव्हा तो त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल आधीपासूनच अपेक्षा निर्माण करतो. तो असंच करणार असल्याची माहिती आहे. पण रवीच्या बाबतीत तसं नाही. अशा परिस्थितीत रवी ही भूमिका त्याच्यापेक्षा चांगली करू शकतो. आणि कदाचित मी त्याला पूर्ण न्याय देऊ शकणार नाही.'' असं दिग्दर्शक किरण राव म्हणाली.


पुढे किरणने कास्टिंग आणि नवीन कलाकारांबद्दलही वक्तव्य केलं. याविषयी बोलताना किरण म्हणाली, मी स्वत:ला भाग्यवान समजते कारण याच्या सपोर्टमध्ये आमिर खानदेखील होता. एवढच नाही तर त्याने हे देखील मान्य केलं की, कथेत गावाशी कनेक्ट करण्यासाठी गावाशी जुळून घेणारे चेहरेच या सिनेमात असणं फार गरजेचं होतं असं त्याचंही मत होतं. त्यामुळे असेच कलाकार आम्हाला हवे होते जे आम्ही या सिनेमाच्या माध्यमातून समोर आणणार आहोत.'' असंही किरण राव या मुलाखती दरम्यान म्हणाली.