मुंबई : आमिर खान आणि करिना कपूर स्टारर लाल सिंह चढ्ढा फ्लॉप झाला आहे. या सिनेमाकडून या सिनेमाची कास्ट आणि टीमला खूप अपेक्षा होत्या. मात्र बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने निराशाजनक प्रदर्शन केलं. आता अनेक वर्षांनंतर आमिर खानची एक्स पत्नी किरण रावने यावर मौन सोडलं आहे. आणि सांगितलं आहे की, कसा या सगळ्याचा अभिनेत्यावर परिणाम झाला होता. 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या 'लाल सिंग चड्ढा'मध्ये आमिर खान व्यतिरिक्त करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्य यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा सिनेमा अद्वैत चंदनने दिग्दर्शित केला होता.  लाल सिंह  चढ्ढा हा चित्रपट टॉम हँक्सच्या 1994 च्या फॉरेस्ट गंपचा  हिंदी रिमेक होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खान आणि करिना कपूर स्टारर लाल सिंह चढ्ढा हा सिनेमा २०२२ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या  सिनेमाकडून अनेकांना खूप अपेक्षा होत्या मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर छाप सोडायला अपयशी ठरला. सिनमाच्या कलेक्शनविषयी बोलायचं झालं तर य सनेमाने ६० करोड इतकी कमाई केली. आता नुकतंच या सिनेमाची  सह-निर्माती किरण रावने बॉक्स ऑफिसवर याच्या अपयशावर भाष्य केलं. यासोबतच हे देखील सांगितलं की, या सगळ्याचा आमिरवर कसा परिणाम झाला


अपयशाचा आमिरला बसला होता फटका 
अलीकडे, झूमला दिलेल्या एका मुलाखतीत, किरण रावने आमिर खान आणि करीना कपूर खान स्टारर चित्रपट लाल सिंग चड्ढाच्या सिनेमाबद्दल सांगितलं. यावेळी किरण म्हणाली, 'हे खरोखर निराशाजनक आहे जेव्हा तुम्ही सगळे प्रयत्न करता आणि ते यशस्वी होत नाही. जे आमच्यासोबत लाल सिंग चड्ढावेळी घडलं. या सगळ्याचा आमिरवर नक्कीच खोलवर परिणाम झाला होता.  फक्त आमिरच नाही तर संपूर्ण टीम वर याचा परिणाम झाला होता.'


पुढे किरण राव म्हणाली,  'हा सिनेमा तिच्यासाठी एक 'ड्रीम प्रोजेक्ट' होता, आमिरने स्क्रिप्टचे अधिकार प्राप्त होण्याआधी एक दशकाहून अधिक काळ प्रयत्न केला होता. सोशल मीडियावर या सिनेमाविषयी सकारात्मक प्रतिसाद असूनही, हा सिनेमा अपयशी ठरला.'' किरणने कबूल केले की, हा चित्रपट प्रेक्षकांशी जोडण्यात अपयशी ठरला आणि तिला वस्तुस्थिती स्वीकारावी लागली.