मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान आणि किर्ती कुल्हारी या जोडीचा 'ब्लॅकमेल' चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. सध्या किर्ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट भविष्यामध्ये बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करेल अशी आशा तिने व्यक्त केली आहे.


 
 अभिनय की बॉक्स ऑफिस कलेक्शन ?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अभिनय की बॉक्सऑफिसवरील कलेक्शन, कलाकाराला कशाची मदत मिळते? हा प्रश्न किर्तीला विचारण्यात आला होता. या  प्रश्नावर उत्तर देताना किर्ती म्हणाली, " दोन्ही कलाकारांना मदत करते. परंतू ही गोष्ट व्यक्ती सापेक्ष आहे.  


 कीर्तीचं म्हणणं काय ?  


 कीर्तीच्या म्हणण्यानुसार, 'माझं काम चांगलं आहे. पण ते बॉक्सऑफिसवर चांगलं कलेक्शन मिळवून देण्यासाठी मदत करत नसेल तर भविष्यात मला नवं काम मिळण्याची शक्यता कमी होते.'  पण ब्लॅकमेक हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कामगिरी करेल. असे त्यांनी म्हटले आहे. 
 
 कीर्ती कुल्हारी नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. लवकरच ती विनोदी चित्रपटामध्ये झळकणार आहे. यापूर्वी कीर्तीने 'पिंक',' इंदू सरकार' अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.