मुंबई : बॉलिवूड आणि मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या मुलाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. किशोरी शहाणे यांचा मुलगा बॉबी विज नेपोटिझमचा बळी पडला आहे. याबाबत किशोरी शहाणे यांना नाराजी व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता बॉलिवूडमध्ये करिअर करणं कठीण झालं आहे. माझा मुलगा बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याला प्लॅटफॉर्म मिळत नसल्याचं किशोरी शहाणे यांनी सांगितलं आहे. 


किशोरी स्वतः इंडस्ट्रीमध्ये ३५ वर्षांपासून काम करत आहेत. आताचे कलाकार नवीन टॅलेंटला संधी देत नाही. त्या म्हणाल्या की, माझे पती दीपक बलराजने नवीन लोकांना ब्रेक दिला आहे. यामध्ये अनेक कलाकारांचा आणि गायकांचा देखील समावेश आहे. कमीत कमी माझ्या मुलाला एक संधी तर द्या. 



इंडस्ट्री विरोधात आपला राग व्यक्त करताना किशोरी शहाणे म्हणतात की, माझा मुलगा कमी वयापासून थिएटर करत आहे. आम्हाला असं वाटतं की, बॉबीला ओळख मिळायला हवी. चांगला ब्रेक बॉबीला मिळायला हवा. आम्ही आमचा एवढा काळ इंडस्ट्रीला दिला आहे. माझ्या मुलाला प्लॅटफॉर्म मिळायला हवा. किशोरीचा नेपोटिझमशी काही संबंध नाही.


'गम है किसी के प्यार में' या शोमध्ये किशोरी शहाणे ही विराटची मावशी भवानी चव्हाणची भूमिका साकारत आहे. किशोरी एक उत्कृष्ट अभिनेत्री, निर्माती आणि नृत्यांगना आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचीही ती निर्माती आहे.