KKBKKJ : `पठाण`समोर भाईजान घसरला; सहाव्या दिवशी कमावले फक्त एवढे...
KKBKKJ Box Office Collection Day 6 : बॉलिवूडचा भाईजान अर्थातच सलमान खानचा `किसी का भाई किसी की जान` या चित्रपटाची आकडे पाहता सहाव्या दिवशीही त्याच्या पदरी निराशा पडली आहे. एकंदरीत पठाण समोर भाईजान फ्लॉप ठरल्याचे दिसून येत आहे.
KKBKKJ Box Office Collection Day 6 : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट 'किसी का भाई किसी का जान' (KKBKKJ) हा चित्रपट शुक्रवारी (21 एप्रिल) बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. सलमानच्या चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ पाहता या चित्रपटाची ओपनिंग डे खूप चांगली नव्हती. पण तीन वर्षांनंतर कमबॅक केलेल्या सलमानला मुख्य भूमिकेत पाहता चित्रपटही तशाच हिट होणं अपेक्षित होतं. पण बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या ओपनिंग डेनंतरचे आकडे पाहता 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या पदरी निराशा पडली आहे.
सलमान खान, पूजा हेगडे, भूमिका चावला, भाग्यश्री, पलक तिवारी, शहनाज गिल, जस्सी गिल, व्यंकटेश आशा या प्रमुख कलाकारांसह किसी का भाई किसी की जान या चित्रपटाने या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी केली नाही. पाचव्या दिवसानंतर ही बुधवारी सहाव्या दिवशी किसी का भाई किसी की जानच्या कमाईत कमालीची घट झाली आहे. मोठ्या आणि नव्या कलाकारांनी सजलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती.
वाचा : समांथाचं ग्लॅमर संपलं, तिनं आता...', अभिनेत्रीच्या करिअरवर निर्मात्याचं मोठं वक्तव्य, तो आहे तरी कोण?
बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, सहाव्या दिवशी सलमान खानच्या किसी का भाई किसी की जानच्या कमाईत सुमारे 30% घट झाली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार सलमान खान स्टारर चित्रपट बुधवारी केवळ 4 ते 4.50 कोटींची कमाई करू शकला आहे. अशा परिस्थितीत पहिल्या आठवड्यात किमान सलमान खानच्या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. 6 दिवसांतही हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार करू शकला नाही.
सलमान खानचा हा चित्रपट गेल्या शुक्रवारी ईदच्या आधी प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगच्या आकड्यांमुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 13.75 कोटींची कमाई केली. 6 दिवसात चित्रपटाची कमाई 82 कोटींवर आली असून पहिल्या आठवड्यात चित्रपट 85 ते 86 कोटींची कमाई करू शकेल असे बोलले जात आहे.
दिवसाची कमाई
- शुक्रवारी 13.75 कोटी रु.
- शनिवारी 24.00 कोटी रु.
- रविवारी 24.50 कोटी रु.
- सोमवारी 9.50 कोटी रु.
- मंगळवारी 6.25 कोटी रु
- बुधवारी 4.00 कोटी रु.
एकूण कमाई रु. 82.00 कोटी