मुंबईः बॉलिवूडमध्ये सध्या लगीनसराई सुरू आहे. रणबीर-आलियाच्या चर्चा थांबत नाहीत, तोच आता आणखी एक कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


क्रिकेटर के.एल.राहुल आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी यांचं नातं काही आता लपून राहिलेलं नाही.



 सोशल मीडियावर दोघांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. आणि आता दोघं लग्नाच्या बेडीतही अडकणार आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. 



दाक्षिणात्य पद्धतीने दोघांचा विवाह पार पडेल अशी माहिती मिळतेय.  त्यामुळे आता दोघांकडूनही लग्नाच्या तयारीला वेग आला आहे.



लग्नापूर्वी दोघांनीही मुंबईत भाडेतत्वावर घर घेतलंय. या घराचं भाडं ऐकून तुमचेही डोळे चक्रावतील.  बांद्रामधील कार्टर रोडवर असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये आलिशान, सी व्यूव्ह असणारा 4 बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला आहे.



 या आलिशान फ्लॅटचं भाडं आहे तब्बल 10 लाख रुपये. हो, अगदी बरोबर. 10 लाख रुपयेच. त्यामुळे चर्चा तर होणारच ना.