केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांच्या नात्यात `या` अभिनेत्रीमुळे दुरावा?
राहुल आणि आथियाच्या नात्यात तिसऱ्या कुणाची एन्ट्री झाल्याची चर्चा आहे.
मुंबई : भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते. अनेक कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये दोघे एकत्र दिसत असतात. एवढंच नाही तर सोशल मीडियावर देखील दोघे एकमेकांसोबत फोटो पोस्ट आपलं प्रेम व्यक्त करतात. त्यांमुळे दोघांच्या पोस्ट चर्चेत तर असतातचं पण तुफान व्हायरल देखील होत असतात. आता सध्या राहुल आणि आथियाच्या नात्यात तिसऱ्या कुणाची एन्ट्री झाल्याची चर्चा आहे.
आता हा फलंदाज नव्या एका अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून केएल राहुलला अनेक प्रश्न देखील विचारले जात आहेत. केएल राहुलने एका अभिनेत्रीच्या फोटोवर कमेन्ट केली आहे. ती एक पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल सोनव बजवा आहे. सोनमने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला.
फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये तिने 'सूर्य मावळत आहे आणि मी तुझ्याबद्दल विचार करत आहे.' असं लिहीलं आहे. तिच्या या कॅप्शनवर केएल राहुलने कमेन्ट केली आहे. त्याने कमेन्टमध्ये 'बस एक कॉल दूर हूं' असं लिहीलं आहे. त्यामुळे सोनम आणि केएल राहुलच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगत आहे. सध्या सोनमची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.