मुंबई : फोटोतला हा चेहरा बघून बहुदा तुम्हाला ओळख पटणार नाही. पण तिच्यासोबत असलेल्या या अभिनेत्याला तर आपण खूपच चांगल ओळखतो. या लोकप्रिय अभिनेता सुनील शेट्टीची ही पत्नी आहे. अभिनेता असलेला सुनील शेट्टी हा बॉलिवूड बिझनेस टायकूनच्या रूपातही त्याला पाहिलं जातं. ही लेडी मुकेश अंबानी ही सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टी आहे. आतापर्यंत माना करोडोंचा फंड एकत्र करू शकली आहे. आणि  हा फंड मानाने आतापर्यंत महिला आणि मुलींच्या उपयोगासाठी वापरला आहे. माना शेट्टीने आतापर्यंत फंड एकत्र करण्यासाठी 'आराइश' नावाचं प्रदर्शन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 एवढंच काय तर सुनील शेट्टी जवळपास 100 करोड रुपयांची कमाई करतो. हा आकडा सोशल मीडियावर जाहीर झाला आहे. सुनील शेट्टीकडे आतापर्यंत फ्लॅट्स, गाड्या, कार, बाइक, रेस्टॉरंट आहेत. एवढंच काय तर त्याच एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे. मात्र असं सगळं असलं तरीही सुनील शेट्टीपेक्षा माना शेट्टी कमाईच्या बाबतीत अग्रेसर आहे. माना शेट्टी ही मुस्लिम कुटुंबातील आहे मात्र याचा फरक सुनील शेट्टीला फरक पडत नाही. 1992 मध्ये 'बलवान' या सिनेमांतून सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. असं असलं तरीही अजून सुनील शेट्टी आपल्या पत्नीच्या कमाईपेक्षा खूप मागे आहे. 


मानासोबत लग्न केल्यानंतर सुनील शेट्टीने भरपूर कमाई केली आहे. आज दोघं पती - पत्नी एकत्र काम करून रिअल इस्टेट प्रोजेक्ट सांभाळत आहेत. मुंबईतील लोकप्रिय भागात लक्झरी विला तयार केला आहे. या बिझनेसमध्ये सुनील शेट्टी बरोबरचे पार्टनर आहेत.