`मेड इन चायना`ची जबरदस्त कमाई; चित्रपटाला चाहत्यांची पसंती
चित्रपटाला चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao)स्टारर बहुचर्चित 'मेड इन चायना' (Made In China) २५ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. राजकुमारच्या 'जजमेंटल है क्या' चित्रपटानंतर चाहत्यांना त्याच्या 'मेड इन चायना' चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चाहत्यांची चित्रपटाला चांगली पसंती मिळताना दिसतेय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'मेड इन चायना'ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'मेड इन चायना'ने ओपनिंग डेला २ कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाकडून आणखी कमाई केली जाण्याची शक्यता होती. पण अक्षय कुमारचा 'हाउसफुल ४' आणि भूमि पेडणेकर, तापसी पन्नू स्टारर 'सांड की आंख' त्याच दिवशी २५ ऑक्टोबर रोजी एकत्रित प्रदर्शित झाला. त्यामुळे याचा परिणाम 'मेड इन चाइना'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाल्याचं चित्र आहे.
'मेड इन चाइना'मध्ये रावकुमार रावने व्यवसायिकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात त्याने व्यवसायासाठी योजलेल्या कल्पना, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतात. चित्रपटात राजकुमार व्यतिरिक्त मौनी रॉय, अमायरा दस्तूर, परेश रावल, बोमन इरानी आणि सुमित व्यास प्रमुख भूमिका साकारत आहेत.