मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 13 वर्षांपासून लोकांना खळखळून हसवत  आहे. दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानी या शोच्या चाहत्यांच्या नेहमीच लक्षात राहील. अनेक वर्षांपासून ही अभिनेत्री टेलिव्हिजनवर दिसली नाही हे माहीत असतानाही तिच्या चाहत्यांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. दिशा तिच्या लग्नानंतरही शोमध्ये काम करत राहिली मात्र प्रेग्नंसी लिव्हनंतरही ती परतली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करोडोंची संपत्ती
एका वृत्तानूसार दिशा वकानीची एकूण संपत्ती करोडोंमध्ये आहे. कारण तिला शो दरम्यान खूप मोठी फी दिली जात होती. 'TMKOC'साठी प्रति एपिसोड 1 ते 1.5 लाख, आणि 2017 मध्ये सुमारे रु. दरमहा 20 लाख एवढी होती. दिशाची टीव्ही प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता वाढल्यानंतर याची तिला टीव्ही जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटमध्ये मदत झाली. आजपर्यंत, अभिनेत्रीची एकूण संपत्ती 5 दशलक्ष डॉलर्स किंवा भारतीय चलनात 37 कोटी आहे. ती बीएमडब्ल्यू प्रीमियम ऑटोमोबाईलसारख्या महागड्या कारचं कलेक्शनही तिच्याकडे आहे.


चित्रपटांमध्येही काम केलं
तिच्या प्रसिद्ध टीव्ही शो व्यतिरिक्त, ती अनेक टीव्ही शो आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. दिशाने  'देवदास', 'मंगल पांडे: द राइजिंग', 'जोधा अकबर', 'सी कम्पनी', 'लव स्टोरी 2050' आणि इतर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती 'खिचडी', 'हीरो भक्ती ही शक्ती है', 'आहट' आणि इतर सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये दिसली आहे.


2015 मध्ये लग्न झालं
दिशा वकानी ही एक अभिनय पदवीधर आणि थिएटर आर्टिस्ट आहे जिने 2015 मध्ये मयूर पडियाशी लग्न केलं आणि नोव्हेंबर 2017 मध्ये तिला पहिला मुलगा झाला.