नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपुतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा करणाऱ्या स्टीव्ह हफच्या व्हिडीओ नंतर देशभरात खळबळ उडाली. स्टीव्हच्या चॅनलवर साधारण १.१ मिलियन सब्सक्राइयबर आहेत. सुशांतच्या आत्म्याशी बोलावं असे असंख्य ईमेल त्याच्या चाहत्यांकडून मला मिळाल्याचे स्टीव्ह हफ सांगतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर यू इन द लाईट ? असा प्रश्न स्टीव हफ विचारताना दिसतो. स्टीव्ह आय एम गेटींग लाईट असे उत्तर त्यात मिळताना ऐकू येते. पण स्टिव आय एम गेटीगं मर्डर असे सुशांत यावेळी बोलल्याचे त्याचे फॅन्स सांगतात. ४ दिवसात ५ लाख जणांनी हा व्हिडीओ पाहीला. 


याआधी ऑगस्ट २०१८ मध्ये पॉप गायक मायकल जॅक्सच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा केला होता. स्टिव्हने एक उपकरण तयार केले असून १० वर्षांपासून आत्म्याशी बोलत असल्याचे स्टिव्ह सांगतो.  



पॅरानॉर्मल एक्सपर्ट नीरव आनंद यांनी यासंदर्भात झी न्यूजला माहिती दिली. आत्म्यांबद्दल सर्वांना माहिती आहे. यातील अनेक गोष्टी काल्पनिक असतात. पण हे वैज्ञानिक युग असून याबद्दल संशोधन सुरु आहे. सायंटीफिक पॅरामीटरच्या माध्यमातून आत्म्यांशी बोलू शकतो असे संशोधन सुरु असल्याचे नीरव आनंद सांगतात. 


या व्हिडीओ शंभर टक्के खरा असल्याचा दावा आम्ही करत नाही. पण यावर अनेक वैज्ञानिक यावर संशोधन करत आहेत. अनेक वैज्ञानिक पॅरानॉर्मल क्षेत्रामध्ये संशोधन करत असल्याचेही नीरव आनंद यांनी सांगितले. 


स्टीव्ह हफ यांनी खूप साहसी प्रयोग केलाय. कारण अनेकजण हे करायला देखील घाबरतात असेही आनंद म्हणाले. 


कोणत्यायाही व्यक्ती जगातून गेल्यास त्याच्या घरच्या व्यक्ती अशाप्रकारे त्या आत्म्याशी बोलण्याची मागणी करतात. पण या घटनेत असे काहीच घडले नाही.चाहत्यांनी ईमेल केले म्हणून आत्म्याशी बोलल्याचे स्टीव्ह सांगतो. व्हिडीओतील आवाज सुशांतचा वाटत नाही. याची वैज्ञानिक बाजुदेखील समोर आली नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या भावनांशी खेळणे सुरु असल्याचे देखील सोशल मीडियात म्हटले जाते. स्टिव्ह यांनी त्यांच्या बॉक्सबद्दल देखील कधी स्पष्टपणे सांगितले नाही. त्यामुळे यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.