अभिनेत्रींना मागे टाकतेय सचिनची लेक
सोशल मीडियावर ऍक्टीव आहे सारा
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नुकतीच 22 वर्षांची झाली आहे. सचिनची लेक सारा अनेकदा आपल्या पालकांसोबत पार्टीत दिसते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सारा सुंदरतेच्या बाबतीत अभिनेत्रींना देखील मागे टाकते.
सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर सारा तेंडलुकरचे 6 लाख 08 हजार फॉलोअर्स आहेत. यावरून तिच्या लोकप्रियतेचा अंदाज आपल्याला येईल. लंडनमध्ये शिकत असलेली सारा आपले अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
सचिन आणि अंजलीला दोन मुलं आहेत. सारा आणि अर्जून अशी त्यांची नावं आहेत. साराचं शिक्षण मुंबईतल्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं आहे. त्यानंतर पुढच्या शिक्षणाकरता लंडनला गेली आहे.
इतर मुलींप्रमाणे साराला देखील तयार होणं, मित्रांसोबत पार्टीला जाणं, सिनेमा पाहणं, गाणी ऐकणं यासारख्या गोष्टी आवडतात. सोशल मीडियावर सारा खूप सक्रिय होती. ती अनेक फोटो आपले सोशल मीडियावर शेअर करत असते. साराचा ड्रेसिंग सेन्स खूप चांगला आहे. तिचे लूक्स अभिनेत्रींना टक्कर देणारे असतात.
अनेकदा सारा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता. मात्र स्वतः सचिन तेंडुलकरने ही अफवा असल्याचं सांगितलं. एकदा अशी बातमी आली होती की, सारा शाहिद कपूरसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकते. तेव्हा सचिनने ट्विट करून ती अभ्यासात व्यस्त असल्याचं सांगितलं होतं.
साराप्रमाणेच लहान भाऊ अर्जून देखील चर्चेत असतो. अर्जून सचिन तेंडलुकरला फॉलो करत आहे. आता तो मुंबई अंडर 19 मध्ये क्रिकेट खेळत आहे.