मुंबई : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' सीझन 7 ची खुप चर्चा सुरु आहे. या सीझनचा दुसरा भाग नुकताच शुट झाला. या दुसऱ्या भागात जान्हवी कपूर आणि सारा अली खानने हजेरी लावली होती. या दरम्यान सारा अली खानपेक्षा जान्हवी कपूरच्या लुकची जास्त चर्चा रंगली होती. कारण जान्हवी कपूर या शोमध्ये इतका बोल्ड ड्रेस परिधान करून पोहोचली की तिचा लूक खुपचं चर्चेत राहिला. विशेष म्हणजे या ड्रेसची किंमत एकूण तुम्हाला धक्का बसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कॉफी विथ करण' सीझन 7 चा दुसरा भाग आज दाखवला जाणार आहे. या दुसऱ्या भागात अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर दिसणार आहेत. 


कसा आहे लुक? 
जान्हवी कपूरने ब्राउन कलरचा ब्रालेस गाउन परिधान केला आहे. जान्हवीचा हा ड्रेस बॅकलेस तर होताच पण समोरच्या बाजूने इतका खुलून दिसत होता की लोकांच्या नजरा तिच्या खोल गळ्याकडे खिळल्या आहेत. तसेच या गाऊनमध्ये एका बाजूला उंच थाई स्लिट आहे, ज्यामध्ये अभिनेत्री उंच टाच आणि मोकळ्या केसांसह मेकअप करताना दिसली होती.


ड्रेसची किंमत किती?


जान्हवी कपूरचा हा ड्रेस खूप बोल्ड तर आहेच पण खूप महागही आहे. अभिनेत्रीने करण जोहरच्या चॅट शोसाठी अलेक्झांडर वौथियर नावाचा हा ड्रेस परिधान केला आहे. या वेबसाइटवर या गाऊनची किंमत 5375 युरो आहे. भारतीय चलनात रूपांतरित केल्यावर त्याची किंमत सुमारे 4 लाख 29 हजार रुपये आहे.  


दरम्यान या दोन य़ुवा अभिनेत्रींच्या एपिसोडची प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय.