मीरा राजपूतसोबत लग्न का केलं? शाहिद कपूरने स्पष्टच सांगितलं, `मी दारू...`
कार्यक्रमात करण जोहरने शाहिद कपूरला त्याच्या लग्नाच्या निर्णयाबाबत खोलात जाऊन विचारलं. लग्नासाठी मीराची निवड का केली? असा प्रश्न करणने शाहिदला विचारला.
koffee With Karan 7: कॉफी विथ करण 7 या नवीन भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होत आहे. त्याचबरोबर प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या सिनेतारकांची दुसऱ्या बाजूचा उलगडा देखील होत आहे. करण जोहर त्याच्या अंदाजात कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना बोलतं करतो. कळत नकळत त्यांच्या चाहत्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गुपितं कळतात. नुकत्याच झालेल्या भागात कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर यांनी हजेरी लावली होती. कबीर सिंग आणि प्रीती या ऑनस्क्रीन जोडप्याने शोमध्ये खूप गप्पागोष्टी आणि मस्ती केली. या कार्यक्रमात करण जोहरने शाहिद कपूरला त्याच्या लग्नाच्या निर्णयाबाबत खोलात जाऊन विचारलं. लग्नासाठी मीराची निवड का केली? असा प्रश्न करणने शाहिदला विचारला. यावर शाहिदने आपलं मत स्पष्टपणे मांडलं.
कार्यक्रमात करणने शाहिदला विचारले, तू लग्नाचा निर्णय विचारपूर्वक घेतला होता का? यावर शाहिद म्हणाला, विचारपूर्वक? लग्न हा कधी विचारपूर्वक घेतलेला निर्णय असू शकतो का? यावर कियारा म्हणाली, हो नक्कीच. कियाराने अशी प्रतिक्रिया देताच शाहिद म्हणाला, जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हाच कळेल की हे समजून घेण्यास तू किती सक्षम आहेस.
शाहिद कपूरने पुढे स्पष्टपणे सांगितलं की, "माझ्यासाठी हा निर्णय खूप सोपा होता. माझ्या आयुष्याचा दोन बाजू आहेत. एकीकडे अभिनेता म्हणून ग्लॅमर आहे. तर दुसरीकडे, माझी कौटुंबिक आणि आध्यात्मिक बाजू आहे. मी आध्यात्मिक आणि शाकाहारी आहे. मी दारू पित नाही. माझ्याकडे या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळेच माझ्या दोन्ही बाजू समजून घेणारा कोणी मला सापडला नाही. यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. मी 34 वर्षांचा होतो आणि मला सेटल व्हायचे होते. कारण मी जवळजवळ 10 वर्षे एकटा राहत होतो."
"माझं कुटुंब आणि मित्रांद्वारे घडले. आम्ही भेटलो आणि माझ्या आयुष्यात घडणारी ही सर्वात चांगली गोष्ट होती. तिने माझ्या आयुष्यात खूप काही आणले. ती मला संतुलित करते. त्यामुळे मला खूप सामान्य वाटते. मुलाबाळांसह आमचं कुटुंब असून यासाठी मी तिचा खूप आभारी आहे.", असंही शाहिदनं पुढे सांगितलं.