मुंबई : शाहरुख खान करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण'मध्ये जवळपास प्रत्येक सीझनमध्ये दिसला आहे. करण जोहर आणि शाहरुख खान हे खूप जुने मित्र आहेत.  शाहरुख कॉफी विथ करणचा दरवेळचा ठरलेला पाहुणा आहे. पण या सीझनमध्ये शाहरुख खान या शोचा भाग नसल्याची बातमी समोर येत आहे. पण या मागचं कारण काय? शाहरुख आणि करण जोहरच्या नात्यात दुरावा आला आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख यावर्षी कॉफी विथ करणमध्ये दिसणार नाही
करण जोहरने एका न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितलं आहे की, यावर्षी शाहरुख खान नाही तर आमिर खान त्याच्या चॅट शोचा भाग असणार आहे. शाहरुख खान कामात व्यस्त असल्याने आणि सध्या मीडियाला सामोरे जाण्याची त्याची इच्छा नसल्याने त्याने यावर्षी  शोमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे.  


करण जोहरने शाहरुखला सपोर्ट केला आहे
त्याच्या जवळच्या मित्राचं समर्थन करत, करण जोहर म्हणाला की, शाहरुख खानचा निर्णय सर्वोत्कृष्ट आहे. कारण एकदा त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला की सार्वजनिक आणि मीडिया कार्यक्रमांचा पूर येईल. करण जोहरने सांगितलं की, शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांना दीर्घकाळ वाट पाहण्यास भाग पाडलं आहे आणि त्याने जितकी प्रतीक्षा केली आहे तितकेच लोकं शाहरुखवर प्रेमाचा वर्षाव करतात.


'टायगर' आणि 'पठाण' यूनिवर्समध्ये होणार आता मर्ज
शाहरुख खानच्या या चित्रपटाद्वारे निर्माते 'टायगर' आणि 'पठाण' या विश्वाला एकत्र करण्याचा विचार करत आहेत. शाहरुख खान आणि सलमान खान बऱ्याच काळानंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. इतकंच नाही तर शाहरुख खान अनेक चित्रपटांमध्ये कॅमिओ भूमिका साकारताना दिसणार आहे. ब्रह्मास्त्र आणि लाल सिंग चड्ढा यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.