बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता करण जोहर सध्या कॉफी विथ करणच्या 8 व्या सीझनमुळे चर्चेत आहे. कार्यक्रमाचे दोन एपिसोड प्रदर्शित झाले असून, आता प्रेक्षकांना पुढील एपिसोड्समध्ये कोणते सेलिब्रिटी पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे. यादरम्यान करण जोहरने नवा प्रोमो शेअर केला असून यामध्ये अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी झळकणार असल्याचं दिसत आहे. याशिवाय करीना कपूर, काजोल, अनन्या पांडे, सारा अली खान असे अनेक सेलिब्रिटीही काऊचवर असतील हे स्पष्ट झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रोमोत करण जोहर अजय देवगणला इंडस्ट्रीतील तुझा सर्वात कट्टर शत्रू कोण? अशी विचारणा करताना दिसत आहे. यावर अजय देवगण करण जोहरला एकेकाळी तूच माझा सर्वात कट्टर शत्रू होतास हे तोंडावर सांगून टाकतो. या उत्तरावर करण जोहरही सहमती दर्शवतो. 


अजय देवगण आणि करण जोहरचं शत्रुत्व


करण जोहर आणि अजय देवगण यांच्यात कधीच चांगले संबंध नव्हते. 2016 मध्ये करण जोहरचा 'ए दिल है मुश्कील' आणि अजयचा 'शिवाय' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आले होते. अजय देवगणने यादरम्यान एक्सवर एक ऑडिओ क्लिप शेअर केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यामध्ये अजय देवगणचा सहकारी आणि कमाल खान यांच्यातील संभाषण होतं. करण जोहरने त्याच्या चित्रपटाबद्दल ट्वीट करण्यासाठी मला 25 लाख दिल्याचा दावा यामध्ये केआरकेने केला होता. नंतर त्याने हे फेटाळलं होतं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)


याचा परिणाम करण जोहर आणि काजोलच्या मैत्रीवरही झाला होता. आपण आणि काजोल आता मित्र नाही असं करण जोहरने जाहीर करुन टाकलं होतं. "तिच्यात आणि माझ्यात कधीच काही समस्या नव्हती. समस्या फक्त तिचा पती आणि माझ्यात होती ज्याबद्दल फक्त आम्हालाच माहिती होतं. पण तिने जे नाही केलं त्यासाठी माफी मागितली पाहिजे असं मला वाटतं. 25 वर्षांच्या मैत्रीचा तिने विचार केला नाही. जर तिला पतीला पाठिंबा द्यायचा असेल तर तो तिचा निर्णय आहे. ती पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही. पण तिचीही इच्छा आहे असं मला वाटत नाही. तिचं माझ्या आयुष्यात महत्त्व होतं, पण आता संपलं आहे," असं करण जोहरने सांगितलं होतं. 


पण काही वर्षांनी धर्मा प्रोडक्शनच्या सीईओने दिलेल्या पार्टीत करण जोहर आणि काजोल सर्व वाद, भांडण विसरुन एकत्र आले होते. या पार्टीत करण आणि काजोल एकमेकांना मिठ्या मारताना दिसले होते. इतकंच नाही तर काजोल आणि अजय देवगण कॉफी विथ करणच्या सहाव्या सीझनमध्ये आले होते.