मुंबई : होस्ट करण जोहर त्याच्या खास चॅट शोच्या आणखी एका एपिसोडसह परतला आहे. यावेळी त्याच्या शोमध्ये समंथा रुथ प्रभू आणि अक्षय कुमार पाहुणे म्हणून येणार आहेत. आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये समंथा रुथ प्रभूची वेगळी शैली पाहायला मिळाली असून या व्हिडिओमध्ये ती असं काही बोलली आहे की, लोकं आश्चर्यचकित झाले आहेत. या सीझनमध्ये तिच्या सेलिब्रिटी चॅट शोमध्ये पदार्पण करणारी समंथा करण जोहरला 'दु:खी विवाहितांसाठी' दोष देते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉफी विथ करण 7 प्रोमो व्हिडिओ
या प्रोमोच्या सुरुवातीला अक्षय कुमार सामंथाला  उचलून घेवून एन्ट्री घेतो. व्हिडिओच्या एका भागामध्ये, 'फॅमिली मॅन 2' अभिनेत्रीने शोचा होस्ट करण जोहरला सांगितलं की, 'दुखी विवाहाचं एकमेव कारण करण आहे'. हे ऐकून अक्षय हसला आणि म्हणाला की, मला माझा जोडीदार सापडला आहे. आता तुम्हीच बघा. समंथाचं हे वक्तव्य ऐकून करण जोहरही स्तब्ध झाला आहे.


क्रिस रॉक-विल स्मिथ ऑस्करच्या थप्पड वादाची आठवण करून, करण जोहरने अक्षयला विचारलं, 'जर क्रिस रॉकने टीनाबद्दल विनोद केला तर तू काय करशील?' यावर त्याने उत्तर दिलं की, 'मी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे देईन,' तो पुढे म्हणाला, मिसेस खिलाडीसोबत कोणीही खेळू नये.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे, करण जोहरने समंथाला विचारलं की, जर तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडची बॅचलर पार्टी आयोजित करायची असेल, तर तुम्ही कोणत्या दोन बॉलिवूड हंकला डान्स करण्यासाठी आमंत्रित कराल? यावर तिने 'रणवीर सिंग आणि रणवीर सिंग' असं उत्तर दिलं.