Konkan Hearted Girl Husband : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर ही गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस मराठी 5' मुळे चर्चेत होती. ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यानंतर ती लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं अंकिता वालावलकरनं सांगितलं होतं. त्याशिवाय तिचा होणारा नवरा हा संगीत दिग्दर्शक असल्याचं देखील तिनं सांगितलं होतं. तर 12 ऑक्टोबरला होणाऱ्या पतीबद्दल माहिती देणार असल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी तिनं सुरज चव्हाणसोबत एक व्हिडीओ शेअर केला होता आणि त्यात ती सुरजला सांगताना दिसली की तुझ्या भावोजीला भेटलास ना... कोणाला सांगू नकोस. तेव्हापासून सगळेच अंकिता कोणासोबत लग्न करणार याची चर्चा रंगली होती. आता अंकितानं स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या होणाऱ्या नवऱ्या विषयी खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यासोबत तिनं ती कोणासोबत लग्न करणार असल्याचा खुलासा केला. अंकितानं सगळ्यात आधी तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिनं कॅप्शन दिलं की 'तु आयुष्यात आलीस आणि खरं प्रेम या शब्दाचा अर्थ कळला... आपल्या आयुष्यातला सगळयात मोठा निर्णय...आपण लग्न करतोय.  तुला खुश ठेवणं,तुला हसवणं,आता माझी सवय झाली आहे..आणि ही माझी सवय नेहमी आशीच ठेवेन …माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या सोन्यासारख्या होणाऱ्या बायकोला दसऱ्याच्या शुभेच्छा…' या पोस्टनंतर अंकितानं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. 



अंकितानं दुसऱ्या पोस्टमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. अंकिताच्या होणाऱ्या पतीचे नाव कुणाल भगत आहे. त्याच्यासोबतचा हा फोटो शेअर करत तिनं कॅप्शन दिलं की 'सूर जुळले'. 



यानंतर अंकितानं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यात अंकितानं तिचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अंकितानं कॅप्शन दिलं की 'प्रेम हे एकमेकांसाठी जगणं आहे हे तू सांगितलस, काळाच्या ओघात कळलच नाही. आयुष्य कसं कुठे बदललं, तू भेटलास आणि पुन्हा जगावसं वाटलं. वचन देते एका सुखी कौटुंबिक आयुष्याची तुझी सहचारिणी असेन. दसऱ्याच्या शुभेच्छा.' 



अंकिताच्या या पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या मित्र-परिवारासोबतच चाहत्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.