`रसोडे मे कौन था` व्हायरल व्हिडिओ मधील प्रसिद्ध अभिनेत्री रुपल पटेल हॉस्पिटलमध्ये भर्ती
टीव्ही इंडस्ट्रीची एक लोकप्रिय अभिनेत्री रुपल पटेल यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीची एक लोकप्रिय अभिनेत्री रुपल पटेल यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'साथ निभाना साथिया' या शोमध्ये तिला कोकिला मोदी म्हणूनही ओळखलं जातं. रुपाली पटेल बद्दल आता एक मोठी बातमी समोर आली आहे. एका वृत्तानुसार, शोमध्ये कोकिला मोदीची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री रूपल पटेल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोर्टलमध्ये पुढे असंही नमूद केलं आहे की, त्यांना कोणतीही गंभीर समस्या नाही मात्र सध्या सुरू असलेल्या चर्चांवर रुपल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
रूपल पटेल यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी पसरताच चाहते त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. रूपल पटेल यांना रुग्णालयात का दाखल केलं ते माहित नाही. मात्र या वृत्तावर रुपलनेही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
'साथ निभाना साथिया' या मालिकेत कोकिला मोदी म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या रूपल यांना निर्मात्यांनी 'साथ निभाना साथिया'च्या दुसर्या सीझनसाठी कायम ठेवलं होतं. यानंतर चालू हंगामात अभिनेत्रीचा ट्रॅक संपला आणि तिला दुसऱ्या सिझनमधूम वगळण्यात आलं आहे.
रूपल पटेल यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, 'जेव्हा मी साथ निभाना साथियाच्या सिक्वेलसाठी आले तेव्हा मी फक्त एका महिन्यासाठीच आले होते. आता एक महिना संपला आहे, मी शोच्या बाहेर आहे. सगळ्या चाहत्यांचे आभार मानते.''