कोल्हापूर :  सेलिब्रिटींचे फॅन त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. हो पाहून कधीकधी सेलिब्रीटीही आवाक् होऊन जातात. अशीच एक चिमुकल्या फॅनचा चेहरा जगासमोर आला आहे. ही चिमुकली फॅन आहे ती राणा दा आणि अंजली बाईंची. सिरअलच्या शुटींगच पॅकअप झाल्यानंतर या फॅनला शेकहॅंड केल्याशिवाय राणा दा आणि अंजली बाई तिथून निघत नाहीत अशी पक्की खबर आली आहे. 
 
टीआरपीच्या आकड्यांमध्ये सध्या ती टॉप ५ मध्ये असलेली झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला ही मालिका सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. या मालिकेचा भाग नसलेली पण राणा दा च्या गावात राहणारी त्यांची चाहती सध्या चर्चेत आली आहे. कोल्हापूरात शुटींगच्या ठिकाणी राहणाऱ्या चिमुकलीचे मधुरा अस नाव असून ती सव्वा तीन वर्षाची आहे. मधुराला सन्नी दा, वहिनीसाहेब, राणा दा यांचे डायलॉग अगदी तोंडपाठ आहेत. शूटिंग सुरु असताना कलाकारांच्या गाड्या मधुराच्या घराबाहेर पार्क केलेल्या असतात. 


वर्षभर नियमित 


ती दररोज घराबाहेर येते, कलाकारांशी हात मिळवते आणि त्यांच्याशी काहीच न बोलता निघून जाते.  कलाकार जेव्हा घरी परतण्यासाठी निघाले की मधुरा घराबाहेर येते आणि राणा, अंजली, सन्नी दा, वहिनीसाहेब यांच्यासह सगळ्यांनाच नित्यनियमाने शेकहॅण्ड करते. सुरुवातीला हिच्याबद्दल साऱ्यांनाच कुतुहल वाटल पण शेकहॅण्ड करण्याचा हा शिरस्ता अगदी वर्षभर सुरुच आहे. त्यामुळे मालिकेतील क्रूला ही तिची सवय झाली आहे.