मुंबई : हिमेशनं टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूरसोबत लग्न केलं. शुक्रवारी संध्याकाळी या दोघांचं रिसेप्शन असणार आहे. हिमेशचं लग्न काही ठराविक नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं. हिमेश रेशमियाचा मुलगाही या लग्नाला आला होता, अशी माहिती आहे. नवी दिल्लीतल्या एका गुरुद्वारामध्ये हे लग्न झाल. हिमेश रेशमियाचं हे दुसरं लग्न आहे. हिमेशनं त्याची पहिली पत्नी कोमलबरोबर २२ वर्ष संसार केला आणि मग घटस्फोट घेतला. मागच्या वर्षी जूनमध्ये हिमेशचा घटस्फोट झाला होता. हिमेश आणि सोनियामध्ये जवळीक वाढल्यामुळे त्याच पहिलं लग्न मोडल्याच्याही चर्चा आहेत.


कोण आहे सोनिया ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनिया कपूर टीव्हीमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'कैसा ये प्यार है', 'जुगनी चली जलंधर', 'यह बॉस', 'रिमिक्स' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे. हिमेश आणि सोनिया मागच्या 10 वर्षांपासून डेट करत होते अशा चर्चा आहेत. तिने आतापर्यंत 'किट्टी पार्टी' (रुखसाना), 'आ गले लग जा' (प्रीति), 'पिया का घर' (श्‍वेता), 'कभी-कभी' (नीलू निगम), 'कुसुम' (नैना बजाज), 'कभी हां कभी ना' (अवंतिका), 'सती...सत्‍य की शक्ति' (सानिका), 'ज़ारा' (ज़ारा), 'रिमिक्‍स' (सोनिया रे), 'परिवार' (संगमित्रा शेरगिल), 'कैसा ये प्‍यार है' (नैना खन्‍ना), 'बाबुल की दुआएं लेती जा' (प्रीति), 'जुगनी चली जलंधर' (मंजीत भल्‍ला), 'नीली आंखें' (नीलू निगम), 'कृष्‍णाबेन खाखरावाला' (मिताली कपूर), 'लव यू जिंदगी' (मिताली कपूर), 'येस बॉस' (मीरा श्रीवास्‍तव), 'जय गणेश' (लक्षमी) और 'जय हनुमान' (मंदोदरी) सीरियल्‍समध्ये काम केलय. 


'सोनिया दोषी नाही'


 हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल की आपल लग्न तुटण्यावर हिमेशची आधीची पत्नी कोमलने सोनियाला जबाबदार धरल नाही. कोमलने सोनियाबद्दल एकही उद्गार काढला नाही. सोनियामुळे लग्न तुटल नसल्याच तिच म्हणणं आहे. या प्रकरणात कोणाल विनाकारण कोणाला खेचल नाही गेल पाहिजे. माझा मुलगा आणि परिवार सोनियाला घरातील सदस्याप्रमाणे प्रेम करतात असेही तिने सांगितले.