मुंबई : मागील वर्षी ब्राझीलचा व्हिडिओ म्युझिक प्रोड्युसर कॉन्डजिला याने एक व्हिडिओ अपलोड केला होता. वर्षभरात या व्हिडिओने जगभरातील संगीतप्रेमींवर भूरळ घातली आहे.  


70.96 कोटी वेळा ऐकला हा व्हिडिओ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉन्डजिलाने 8 मार्च 2017 रोजी MC Fioti-Bum Bum Tam Tam नावाचा म्युझिक व्हिडिओ टाकला होता. या व्हिडिओला 70.96 कोटी लोकांनी पाहिला आहे. युट्युबवर या गाण्याने वेड लावले आहे. 


सोशल मीडीयावर क्रेझ  


कोन्डझिलाचं गाणं सोशल मीडियावर खास लोकप्रिय झालं आहे. या गाण्याची क्रेझ पाहून त्यावर अनेक कॉमिक व्हिडिओ बनवण्यात आले होते. 
युट्युबवर कोन्डजिलाच्या युट्युब चॅनलचे 2.8 कोटी युजर्स आहेत. सोबत 14 अरब व्हूज आहेत. जगातील टॉप 5 सबस्क्राईब्ड चॅनलपैकी कोन्डजिलाचं चॅनल  आहे. 



कोन्डझिलाचा संघर्ष  


कोन्डझिलाचा संघर्षही प्रेरणादायी आहे. तो 18 वर्षांचा असताना आईचं निधन  झालं. तिच्या इन्युरंसच्या पैशातून कोन्डझिलाने एक कॅमेरा विकत घेतला. कॅमेर्‍याचा वापर त्याने म्युझिक व्हिडिओ बनवण्यासाठी केला. हळूहळू त्याच्या व्हिडिओला लोकप्रियता मिळत गेली.  


खरं नाव काय  ?


कोन्डझिला या नावाने तो प्रसिद्ध असला तरीही Konrad Cunha Dantas हे त्याचं खर नाव आहे. तब्बल 300 हून अधिक व्हिडिओ त्याने बनवले आहेत. यामधून कोन्डझिलाने खूप पैसे आणि लोकप्रियताही मिळवली.  


करियर सोडलं 


म्युझिक व्हिडिओ बनवण्याचा त्याचा वेडामध्ये सिनेमॅटोग्राफी आणि फोटोग्राफीचा त्याचा अभ्यास मध्येच सोडला. कॉन्डजिला म्युजिशनशिवाय स्क्रीन रायटर आणि दिग्दर्शक आहे. 



2015 साली “Tombei” हा त्याचा व्हिडिओ मल्टी शो अवॉर्ड्ससाठी नॉमिनेट झाला होता. इंस्टाग्रामवर कोन्डझिलाचे 14 लाख फॉलोवर्स आहेत.