मुंबई : अभिनेत्री कोंकणा सेन तिच्या अभिनयामुळे ओळखली जाते. तिने तिच्या आता पर्यंतच्या कारकिर्दीत प्रत्येक भूमिका अतिशय सुंदर पार पाडली. नेहमीच अभिनेत्री तिच्या प्रोफेशन आयुष्याप्रमाणेच तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. लवकरच अभिनेत्री 'किलर सूप' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. ती तिच्या 'किलर सूप'  या आगामी  वेब सीरिजमळे सध्या चर्चेत आहे. सध्या या वेब सिरीजच्या प्रमोशनमध्ये कोंकणा सेन व्यस्त आहे. ती या सिरीजमध्ये  मनोज बाजपेयी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किलर सूप वेबसिरीजच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रमोशनदरम्यान कोंकणा सेन तिच्या चित्रपटाव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने बोलताना दिसत आहे. यावेळी बोलतना कोंकणाने तिच्या एका वाईट सवयीबद्दल मोठा खुलासा केला आहे. ती वाईट सवय सोडण्याचा तिने खूप प्रयत्न केला मात्र यामध्ये ती अपयशी ठरली आहे. एका मुलाखती दरम्यान अभिनेत्रीला विचारण्यात आलं की, तिची वाईट सवय कोणती आहे? यावंर बोलताना ती म्हणाली की, 'माझ्या वाईट सवयीबद्दल बोलयचं झालं तर ती सिगारेट आहे.' 


या दिवसांना आयुष्यातून काढून टाकायचं आहे कोंकणाला  
कोंकणाने या मुलाखती दरम्यान म्हणाली की, मी जास्त प्रमाणात स्मोकिंग करत नाही पण तरिही आता ही सवय मला माझ्या आयुष्यात नको आहे. मला काहीही करुन ही सवय सोडायची आहे. एवढंच नव्हेतर कोंकणाने तिच्या वाईट दिवसांबद्दलही वक्तव्य केलं आहे. याविषयी बोलताना तिने सांगितलं की, 'मला माझ्या आयुष्यातून ते 3 महिने काढून टाकायचे आहेत जेव्हा मी बेड रेस्टवर होती.' अभिनेत्रीने या दिवसांना तिच्या सर्वात वाईट कालावधीपैकी एक म्हटलं आहे.
 
११ जानेवारीपासून स्ट्रीम होईल सिरीज
किलर सूप या वेब सिरीजमध्ये मनोज वाजपेयी डबल रोलमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपुर्वी या सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ११ जानेवारीपासून ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही एक कॉमेडी मर्डर मिस्ट्री फिल्म आहे. या वेबसिरीजची प्रेक्षक गेले अनेक दिवस आतुरतेने वाट पाहत आहेत.