`हा` अभिनेता साकारणार बाबा रामदेव...
बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण सातत्याने नवनवे प्रयोग करत असतो.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण सातत्याने नवनवे प्रयोग करत असतो. मराठीतील पर्दापणाबरोबरच तो बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित एक शो बनवत आहे.
काय आहे हा शो?
या शोमध्ये बाबा रामदेव यांच्या जीवनातील संघर्ष दाखवण्यात येणार आहे. ही मालिका डिस्कवरी जीत वर प्रसारित होणार आहे. ‘स्वामी रामदेव : एक संघर्ष’असे या मालिकेचे नाव असून त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. अजयने सोशल अकाऊंटवरून याची माहिती दिली.
कोण साकारणार बाबा रामदेव यांची भूमिका?
या शो ची निर्मिती अजय व अभिनव शुल्का करत आहे. तर नमन जैन हा बाबा रामदेव यांची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी त्याने रांझणा मध्ये छोट्या धनुषची भूमिका साकारली होती. बाबा रामदेव यांच्या मोठेपणीची भूमिका क्रांति प्रकाश झा साकारत आहे. यापूर्वी त्याने ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’मध्ये धोनीच्या मित्राची भूमिका साकारली होती. यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर त्याने बाबा रामदेव यांच्यासोबतही खूप वेळ व्यतीत केला आहे.