Kriti Sanon : सध्या बॉलिवूडमध्ये आपल्याला अनेक उच्च शिक्षण घेतलेले अभिनेते आणि अभिनेत्री पाहायला मिळतीलच. त्यातून असे अनेक कलाकार आहेत जे केवळ त्यांच्या उच्चशिक्षणासाठीच ओळखले जात नसून त्यांनी इतरत्रही अनेक क्षेत्रांमध्ये आपलं नाव कामावलं आहे. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका उच्चशिक्षित अभिनेत्रीची. जी खरंतर खूप मोठी आयटी इंजिनिअर आहे परंतु आता मात्र ती पुर्णत: बॉलिवूडचेच चित्रपट करताना दिसते आहे. तिचे आतापर्यंत अनेक लोकप्रिय चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवरही खूप हीट ठरलेले आहेत. परंतु हे वर्ष काही तिच्यासाठी चांगलं नव्हतं. त्यातून यावर्षी आलेला तिचा 600 कोटी रूपयांचा चित्रपट अक्षरक्ष: धुळीला मिळाला होता. त्यातून ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आज तिचा वाढदिवस आहे. तेव्हा जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2000s च्या काळात तुम्हाला टुथपेस्ट, आईस्क्रिम वैगेरेच्या जाहिराती आठवत असतीलच. याच जाहिरातींतून ही अभिनेत्री तेव्हा चांगलीच लोकप्रिय होती परंतु आपल्यापैंकी कोणालाच ही कल्पना नसेल की ही अभिनेत्री पुढे जाऊन बॉलिवूडची फारच लोकप्रिय अभिनेत्री होणार आहे. आज तिच्या स्माईलचे आणि तिच्या सौंदर्याची कायमच चर्चा केली जाते. त्यातून तिनं मोठ्या सुपरस्टारसोबत कामही केले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तर तिचे नावं क्रिती सनन आहे. क्रिती सनन ही एकेकाळी जाहिरातींतून कामं करायची. तेव्हा ती मॉडेलिंगही करत होती. ती तिच्या हाईट आणि स्वीट स्माईलसाठी ओळखली जाते. तिचे फॅन फॉलोईंगही खूप आहे. इन्टाग्रामवर तिचे 54 कोटी फॉलोवर्स आहेत. 


हेही वाचा - Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...


यावर्षी तिचा 'आदिपुरूष' हा चित्रपट चांगलाच आटपला. त्यातून सिद्धिविनायक मंदिरात दिग्दर्शक ओम राऊतसोबत दर्शनला आणि प्रमोशनला गेलेल्या क्रिती सननला ओम राऊत तिथे कीस केल्यामुळे बराच वादंग पसरला होता. त्यातून हा चित्रपट प्रेक्षकांनाही रूचला नाही आणि या चित्रपटाला सपाटून ट्रोल करण्यात आले होते. एडव्हान्स बुकींगच्या आणि नकारात्मक प्रसिद्धीच्या साहाय्यानं हा चित्रपट 400 कोटी कमवू शकला असा काही जाणकारांचा अंदाज होता. त्यातून सध्या या चित्रपटाची हवा नाहीशी झाली आहे. 



क्रिती सनन ही सुशांत सिंग राजपूतलाही डेट करत होती. त्यामुळे तेव्हाही त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांनी एका चित्रपटातून कामंही केले होते.