बोटॉक्स केलं... चेहरा बदलला; कॉस्मेटिक सर्जरीवर Kriti Sanon पहिल्यांदा बोलली की,`मी प्रेशर...`
आलिया भट्टबद्दल सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, तिने बोटॉक्स केले आहे जे अपयशी ठरले आहे. बोटॉक्सच्या अपयशामुळे आलियाची हसण्याची आणि बोलण्याची पद्धत विचित्र असल्याचा दावा केला जात आहे. या सगळ्यादरम्यान क्रिती सेननने पहिल्यांदा बोटॉक्स विषयावर आपले मत उघडपणे व्यक्त केले आहे.
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या तिच्या 'दो पट्टी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून यात क्रिती व्यतिरिक्त काजोल आणि शाहीर शेख देखील दिसले होते. शाहीर शेखचा हा बॉलिवूड डेब्यू होता. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान क्रिती सेनन बोटॉक्स सर्जरीबद्दल अतिशय मोकळेपणाने बोलली आहे. अनेक बॉलिवूड कलाकार अधिक सुंदर दिसण्यासाठी ही सर्जरी करतात. पण ही सर्जरी यशस्वी होतेच असं नाही. असं असताना क्रिती सेननला याबदद्ल नेमकं काय वाटतं?
मुलींसाठी परिपूर्ण महत्त्वाच?
एकीकडे आलिया भट्टबाबत बोटॉक्सचा मुद्दा चर्चेत आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री क्रिती सेननने बोटॉक्स कॉस्मेटिक सर्जरीबद्दल सांगितले. यावेळीही तिने मनमोकळेपणाने उत्तर दिले की, तिला चांगले दिसण्याचे दडपण वाटत नाही. क्रिती म्हणाली की, ती कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करणाऱ्या लोकांना जज करत नाही, परंतु तरुण मुलींवर नेहमीच परिपूर्ण दिसण्यासाठी दबाव आणू नये अशी इच्छा यावेळी तिने व्यक्त केली आहे.
दडपण घेऊ नका
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत क्रिती म्हणाली की, 'मी कोणालाही जज करत नाही, प्रत्येकाचा स्वतःचा मार्ग असतो. तुमच्या शरीराचा कोणताही भाग बदलून तुम्हाला आत्मविश्वास वाटत असेल तर ते तुमच्यावर आहे. हा प्रत्येकाचा निर्णय असावा. मग तुमच्या या निर्णयाने जे काही होईल त्याला सामोरे जावे लागेल. हे तुमचे जीवन आहे, तुमचे शरीर आहे, तुमचा चेहरा आहे. बोटॉक्स केलेल्या कोणत्याही व्यक्तीला मी जज करत नाही. पण हो, तरुण मुलींना नेहमी सुंदर दिसण्याचे दडपण जाणवू नये असे मला वाटते.
क्रिती पुढे म्हणाली की, कोणीही प्रत्येक वेळी परिपूर्ण दिसू शकत नाही. मी पण खूप वेळा दिसले नाही. क्रिती म्हणाली, "जर तुम्ही अशा व्यवसायात असाल तर तुमच्यातील एक भाग नेहमीच चांगला दिसला पाहिजे." क्रिती म्हणाली की, पिंपल्समुळे मी एकेकाळी दुःखी झाली होती. पण कालांतराने तुम्हाला त्यामध्ये बदल करण्याची गरज भासते पण असुरक्षित वाटत नाही.
जर तुम्हाला नैसर्गिकरित्या सुंदर दिसायचे असेल तर मी म्हणेन की तुम्ही तुमचे आरोग्य, आहार आणि मानसिक स्थितीची काळजी घ्या. हे फार महत्वाचे आहे. आपण आपल्या मानसिक आरोग्यासाठी जे काही करतो ते आपल्या चेहऱ्यावरही दिसून येते. तुम्ही स्वतःची काळजी कशी घेत आहात यावर तुमचे कल्याण अवलंबून असते.