सुपर फ्लॉप ठरणार सलमानचा `दबंग ३`, अभिनेत्याचं भाकित
सलमान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तारे वरची कसरत करताना दिसत आहे.
मुंबई : अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'दबंग ३' चित्रपटाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना तर चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. सलमान सुद्धा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तारे वरची कसरत करताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील चित्रपटाबद्दल कमालीचा उत्सुकता आहे. परंतु बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने सलमानचा 'दबंग ३' चित्रपट आणि गाणी फ्लॉप ठरण्याचा दावा केला आहे.
ट्विटरच्या माध्यमातून अभिनेता कमाल राशिद खान म्हणजे केआरके चित्रपटावर टीका केली आहे. सोशल मीडियावर चित्रपट समिक्षक म्हणून देखील त्याची ओळख आहे. स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरून त्याने दोन वेळा 'दबंग ३' चित्रपटावर निशाना साधला आहे.
'दबंग ३ चित्रपटाचा ट्रेलर फ्लॉप झाला त्याचप्रमाणे गाणी देखील फ्लॉप ठरली आहेत. हा चित्रपट १५० कोटी रूपयांचा गल्ला जमा करण्याची शक्यता आहे.' केआरकेच्या या ट्विटला चाहत्यांनी मात्र विरोध केला आहे.
‘दबंग ३’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट 'मरजावां' चित्रपटा प्रमाणे सुपर फ्लॉप ठरणार असल्याचे वक्तव्य त्याने केले.
येत्या २० डिसेंबर रोजी 'दबंग ३' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटासाठी अॅडव्हान्स बुकिंगही करता येणार आहे. त्यामुळे 'दबंग' 'दबंग २'प्रमाणेच 'दबंग ३'लाही प्रेक्षकांची पसंती मिळणार का? हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.