Kubra Sait and Salman Khan News: सलमान खान सतत कुठल्या ना कुठल्या कारणासाठी चर्चेत असतो. कधी वेगवेगळ्या वादांमुळे त्याची चर्चा रंगते तर कधी वेगळ्याच कारणांमुळे त्याची चर्चां रंगत असते. परंतु ह्या ना त्या कारणानं सलमान खान (Salman Khan) हा कायमच चर्चेत असतो. सध्या पुन्हा एकदा सलमान खान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. यावळी कारण मात्र काहीतरी वेगळं आहे. सलमान खानच्या 12 वर्षांपुर्वीच्या एक किस्स्यामुळे आजही सेक्रेड्स गेम्समधील एक अभिनेत्री आजही अस्वस्थ होताना दिसते आहे. परंतु तेव्हा नक्की असा कोणता किस्सा घडला होता, ज्यामुळे अभिनेत्री त्यामुळे सलमान खानचं नावं आजही विसरता येत नाही. या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर आपल्या अभिनयानं अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. (kubra sait opens about salman khan unprofessionalism at work after 12 years ready film co actors)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेक्रेड गेम्स (Secret Games) ही वेबसिरिज आपण सगळ्यांनीच पाहिली असेल. या वेबसिरिजमधील अनेक पात्र ही आजही अनेकांच्या आवडीची आहेत. ही वेबसिरिज तिच्या बोल्ड संवादांमुळे आणि सीन्समुळे प्रचंड गाजली होती. या सिरिजमधील अजून एक कॅरेक्टर होतं जे अनेकांच्या लक्षात राहिले. ते म्हणजे अभिनेत्री कुब्रा सेटचं कूकु हे पात्रं. कुब्रा सेट (Kubra Sait) या अभिनेत्रीनं ओटीटीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला आज कोण ओळखत नाही. सगळेच तिला ओळखतात आणि त्याचसोबत तिच्या वेगळ्या अभिनयाचे सगळीकडे कौतुकही केले जाते. 


परंतु सध्या कु्ब्रानं सलमान खानसोबतचा एक धक्कादायक किस्सा समोर आणला आहे हा किस्सा 12 वर्षांपुर्वीचा आहे. परंतु आजही तिला तो किस्सा असवस्थ करत असतो याबद्दल ती अजूनही व्यक्त होताना दिसते आहे. कुब्रा सेटनं 2011 साली सलमान खानच्या रेडी (Ready) या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिनं मोलकरीणीची भुमिका केली होती. परंतु तेव्हाच्या काही सलमान खानच्या किस्स्यांवर कुब्रानं वक्तव्य केलं होतं. 


कुब्रा म्हणाली की, ''मी पहाटे 5.30 ला माझ्या चित्रपटाच्या शुटिंगसाठी आले परंतु मला त्यावेळी थांबवले गेले आणि त्यानंतर माझे शूट होईपर्यंत मी ब्रेकफास्टची मागणी केली त्यानंतर मला एक सफरचंद देण्यात आले मग मी पुन्हा ब्रेकफास्टची मागणी केली तेव्हा मला पुन्हा सफरचंद देण्यात आले. मग माझ्या शूटिंगची वेळही पुढे ढकलण्यात आली. माझे शूट 10 वरून अकरा झाले मग बारा झाले पण माझं शुटिंग काही करून सुरू होईना. 



मग सेटवर कसलीतरी गडबड सुरू झाली, तेव्हा कुण्या मोठ्या एका व्यक्तीची एन्ट्री झाली. तो सलमान खान होता आणि तो आल्या आल्या लगेचच म्हणाला की, आपण लंच ब्रेक घेऊया. तेव्हा तर मी खूपच रागावले आणि अस्वस्थ झाले की, मी सकाळपासून दोनच सफरचंदावर होते आणि सलमानला तर चक्क लंच ब्रेक... तोही आल्या आल्या?", असा किस्सा कुब्रानं सांगितला.