मुंबई : सोहा अली खान आणि कुणाल खेमु यांची मुलगी इनाया ६ महिन्यांची झाली आहे. हा क्षण या कपलने खास अंदाजात सेलिब्रेट केला. त्यांनी आपल्या प्रिंसेसच्या हाफ बर्थडेचे फोटो सोहाने आपल्या इंस्टा अकाऊंटवरून शेयर केले. यामध्ये ती आणि कुणाल मुलीकडून बर्थ डे केक कापून घेत आहे. इनायाचा जन्म सप्टेंबर २०१७ ला झाला. इनायाचे क्यूट फोटो सोशल मीडियावर वायरल होतच असतात. या बर्थडे बॅनरवर  It's my 1/2 birthday असे लिहिले आहे. क्यूट इनाया मम्मी-पप्पांसोबत केक कापताना दिसत आहे. इनाया फोटोत खूप आनंदी दिसतेय. कुणाल आणि सोहाचा आनंदही गगनात मावेनासा झालाय.  जरी हा तुझा पूर्ण वाढदिवस नाही तरीही सेलिब्रेट करण्याचे कारण खास आहे.


सोहाला वाटतेय भिती 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इनाया सोशल मीडियावरील आवडत बाळ असून लहान वयातही ती खूप चर्चेत असते.



पण सोहाला या गोष्टीची नेहमी काळजी असते.



इनायाला नजर लागू नये म्हणून सोहा तिच्या माध्यावर काळा टीळा लावते. नुकतेच इनायाचे फोटो सोहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले.