पोलिसांच्या टिंगल टवाळी प्रकरणानंतर कुशल बद्रीके पहिल्यांदाच सर्वांसमोर, VIDEO व्हायरल
आता पोलिसांच्या टिंगल टवाळी प्रकरणानंतर पहिल्यांदाच कुशलने एक पोस्ट शेअर केली आहे.
मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या शोच्या सेटवर नुकतीच पोलिसांनी हजेरी लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे सगळीकडेच एकच चर्चा सुरु झाली होती.
भाऊ कदम आणि कुशल बद्रीके यांना अटक करण्यासाठी पोलिस सेटवर आल्याचं दिसून येत होतं. या व्हिडिओमुळे चाहते देखील हादरले होते.
आता पोलिसांच्या टिंगल टवाळी प्रकरणानंतर पहिल्यांदाच कुशलने एक पोस्ट शेअर केली आहे. हा व्हिडिओ कुशलने अभिनेत्री श्रेया बुगडेसोबत तयार केला आहे. ज्यातील भाऊ कदमचा अंदाज खूपच चर्चेत आहे.
नुकताच बॉक्स ऑफिसवर पुष्पा हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने सगळ्यांनाच आपल्या प्रेमात पाडले.
आता 'चला हवा येऊ द्या'च्या टीमनेही या सिनेमातील पात्रांची भूमिका आपल्या अॅक्टमध्ये साकारली आहेत.त्याचदरम्यानचा व्हिडिओ कुशलने नुकताच पोस्ट केला आहे.
चला हवा येऊ द्याच्या सेटवर पोलिस का आले होते?
चला हवा येऊ द्या च्या सेटवर घडलेला सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला असून चाहत्यांना हा व्हिडिओ संभ्रमात पाडणारा ठरला.
त्याच घडलं असं की, शुटींग सुरु असताना पोलिसांच्या टीमनं हवा येऊ द्या मधील कलाकारांविरोधात तक्रार दाखल झाल्याचं सांगितलं. त्यांची चौकशीची करणार असल्याचं ही पोलिस म्हणाले.
भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार होती की, त्यांनी पांडू सिनेमाच्या शुटींग दरम्यान ट्रेनिंग वेळी टिंगल टवाळी केली आहे.
पोलिसांनी थेट भाऊ आणि कुशल यांना सेटवरुन बाहेर नेत त्यांच्यासोबत बातचीत केल्याचं ही दिसून आलं. त्यामुळे सेटवर उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच काळजाचा ठोका वाढला होता.
कुशल आणि भाऊ यांनी नुकतीच पांडू या सिनेमात पोलिसांची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांच्यावर तक्रार झाल्याने ते देखील चकीत झाले.
अखेर या प्रँकचा शेवट करायचा ठरला आणि डॉ. निलेश साबळे यांनी सेटवर आलेल्या पोलिसांची खरी ओळख सगळ्यांना करुन दिली. हा प्रँक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.