मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मधील सर्वच कलाकार हे तळागाळातून आलेले आहेत. परिस्थितीचे चटके खाऊन पुढे आलेले आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही. ग्लॅमर पचवणं त्यांच्यासाठी काहीच कठीण नाही. कारण त्यांनी सर्वसामान्याच्या घरातील गरीबी पाहिली आहे. कुशल बद्रिके हा कलाकार त्याची लव्ह स्टोरी सांगत होता. पण ही लव्ह स्टोरी एवढी साथी सोपी नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लव्ह स्टोरीत आपल्या सर्वसामान्याच्या घरातील गरीबीला सांभाळून घेणारी किनार दिसून आली. गरीबीतही प्रेमात एक लक्ष्मी धावून येते. गरीबीतही प्रेम जिवंत ठेवणाऱ्या काही व्यक्ती असतात, आणि तेच खरं प्रेम असतं, हे या निमित्ताने आणखी अधोरेखित झालं आहे.


कुशल बद्रिके याचे वडील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, त्यामुळे कुशल बद्रिकेची आर्थिक परिस्थिती बेताची होती. कुशल बद्रिकेचे नाटकाचे प्रयोग लागले की त्याला धडधड व्हायची कारण नाटकाचे भत्ते वेळेवर मिळायचे नाही. त्यातही प्रयोग लागले तर मग खायचं काय? असा प्रश्न कुशल बद्रिकेसमोर उपस्थित व्हायचा.


यावर कुशल बद्रिके म्हणतो, माझ्याकडे पैसे नसायचे, पण कुणीतरी मुलगी माझ्या बॅगेत ५० ते ६० रुपये गुपचूप टाकायची. यामुळे माझं पोटंही भरायचं, वडापाव, बसभाडं सर्वकाही व्हायचं. जी मुलगी बॅगेत पैसे टाकायची ती माझीचं प्रेयसी होती. ती समोर बसली आहे आणि तिला मला थँक्स म्हणायचंय, असं कुशल बद्रिकेने म्हटलंय. या बातमीत फोटोत दिसणारी ती मुलगी हिच आहे, जी आता कुशल बद्रिके यांची सौभाग्यावती आहे.