मुंबई : आज अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री प्रार्थनाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. एखादी पोस्ट प्रार्थनाने सोशल मीडियावर टाकताच ती व्हायरल होवू लागते. प्रार्थना जितकी ती तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते तितकीच ती तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते. प्रार्थनाचा मित्र परिवारही खूप मोठा आहे. आज तिच्या वाढदिवसामुळे तिचे अनेक सेलिब्रिटी मित्र तिच्यासाठी पोस्ट शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शिवानी सुर्वे, स्वप्निल जोशी, सोनाली कुलर्णीनंतर आता  अभिनेता कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर प्रार्थना बेहरे ही मराठी सिनेसृष्टीत सगळ्यांचीच खूप चांगली मैत्रिण आहे. तिच्या वाढदिवसानिमीत्त सिनेसृष्टीतील अनेक कलाकार तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. नुकतीच कुशलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहीलं आहे की, ''आपली मैत्री सुरू झाली ती फोटो साठी उधार घेतलेल्या तुझ्या trolley bag पासून का मग.. London मधे तू पाजलेल्या पहिल्या black-coffee पासून…छे.. छे.. आपली मैत्री सुरू झाली ती, “तू” दिग्दर्शन करत असलेल्या आणि संजू दादाने dop म्हणून काम केलेल्या “reels” पासून. ज्यात मी, शिवानी सुर्वे, संजय नार्वेकर सर, अभिनय बेर्डे , संजू दादा अश्या कलाकारांनी career ला जरासं statue देऊन, आयुष्यातला खरा आनंद शोधला.  आपल्या सगळ्यांना बांधून ठेवणारा “मैत्रीचा धागा” एखाद्या “दोऱ्याच्या रिळ” मधे नसून “instaच्या रील” मधे आहे हा शोध तुझाच. (wow मला काय वाक्य सुचलंय बघ!



आत्ता सोबत असतीस तर म्हणाली असतीस ह्यावर काहीतरी reel करू यार) तुझ्या बाबतीत मला एका गोष्टीचं कायम कौतुक वाटतं तू किती “सोपं” करुन घेतलं आहेस स्वतःला यार. मित्र सोबत असताना मज्जा करणाऱ्या आणि जेंव्हा फक्त स्वतः सोबत असतेस तेंव्हां जरा जास्त मज्जा करणाऱ्या मैत्रीणे तुला happy birthday आणि खूप प्रेम.'' कुशलने ही पोस्ट शेअर करताच ही पोस्ट चर्चेत आली आहे. याचबरोबर त्याने प्रार्थनासोबतचे अनेक फोटोही सोशल मीडियावर शेअर करत तिला वाढदिवसाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.