मुंबई : बॉलिवूडचा मि परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. बॉलिवूडचा हा स्टार वर्षातून निव्वळ एकच सिनेमा करतो. मात्र हा सिनेमा असा करतो की तो हिट ठरायलाचं हवा.वर्षातून फक्त एकच सिनेमा करून सुद्धा आमीर खान लखपती कसा असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडतो. त्यामुळे जाणून घेऊयात आमिरची नेमकी संपत्ती आहे किती ती... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत आलिशान घर 


आमिर मुंबईतील वांद्रे सारख्या पॉश एरीयात राहतो, त्याचे घर खूप मोठे आणि आलिशान आहे. याशिवाय त्याच्या घरात एक मोकळा परिसर आहे जिथे तो आपल्या मित्रांसाठी पार्टी आयोजित करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिरच्या या घराची किंमत सुमारे 60 कोटी आहे. याशिवाय त्यांनी 2013 साली पाचगणी येथे 2 एकर जमीन खरेदी केली होती, ज्याची किंमत 7 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. आमिरचे आणखी दोन आलिशान फ्लॅटही आहेत, जे मरिना आणि बेला विस्टा, पाली हिल वांद्रे येथे आहेत. 


मुंबईत कार्यालये
आमिरची मुंबईत 4 कार्यालये असून त्यांची किंमत 35 कोटी रुपये आहे. याशिवाय 2017 मध्ये आमिरने फर्निचर रेंटल स्टार्टअप FURLENCO मध्ये 2 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.आमिर व्यावसायिक मालमत्तांमध्येही गुंतवणूक करत असतो. 


महागड्या गाड्यांचा संग्रह 
आमिरला महागड्या गाड्या संग्रह करण्याचा छंद आहे. त्याच्याकडे  रॉल्स रॉय्स घोस्ट (Rolls-Royce Ghost) आहे. बॉलीवूडमधील ही ब्रिटिश लक्झरी कार संजय दत्त आणि हृतिक रोशनकडे देखील आहे. या वाहनाची किंमत जवळपास 6.83 कोटी रुपये आहे. याशिवाय आमिरकडे Bentley Continental Flying Spur  कार आहे ज्याची नंबर प्लेट खूप खास आहे. या कारचा क्रमांक '0007' आहे. या कारची किंमत 3.21 ते 3.41 कोटींच्या आसपास आहे. या वाहनांशिवाय आमिर खानकडे रेंज रोव्हरही आहे. या वाहनाची किंमत 2.31 कोटी ते 3.41 कोटी आहे.


चित्रपटासाठी घेतो इतकं मानधन 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर एका चित्रपटासाठी 50 ते 60 कोटी रुपये घेतो. चित्रपटांव्यतिरिक्त, तो जाहिरात चित्रपटांसाठी मोठी रक्कम घेतो.