नवी दिल्ली : काळवीट शिकार प्रकरणी २० वर्षानंतर जोधपूर कोर्टाने निर्णय सुनावलाय. मुख्य न्यायमूर्ती देव कुमार खत्री यांनी सलमानला या प्रकरणात दोषी ठरवलंय. तर अभिनेता सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांना कोर्टाने निदोर्ष मुक्त केलेय. सलमान खानला याप्रकरणात दोषी ठरवल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ १९९८ वर्षातला असल्याचे सांगितले जातेय. ज्यावेळी काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानवर खटला दाखल केल्यानंतर त्याला वन विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले होते.


व्हिडीओत सलमान खान वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बसल्याचे दिसतेय. वन विभाग अधिकाऱी त्याला दिलेल्या जबाबाच्या कॉपीवर सही करण्यास सांगतायत. यात सलमान थोडा नाराज दिसतोय.हा व्हिडीओ desitubeच्या यूट्यूब पेजवर अपलोड करण्यात आलाय. 


किती वर्षांची शिक्षा?


ऑक्टोबर १९९८ रोजी मध्यरात्री दोन काळवीटांची  शिकार केली, असा सलमानवर आरोप ठेवण्यात आलाय. सलमानवरील हा सिद्ध झाल्यास त्याला सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते.  सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.


काय आहे हे प्रकरण?


'हम साथ साथ हैं ' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. त्यावेळी त्यांनी शिकार केली. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला.