मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल आहे. या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेत 'लाडू'ची एन्ट्री झाल्यानंतर ही मालिका आणखी लोकांना आवडत आहे. राजवीर या छोट्या कुस्ती पैलवानाची एन्ट्री झाल्यामुळे मालिकेला एक वेगळंच वळण मिळालं. शाळेला सुरुवात झाली आहे. लहान मुलांचं शाळेत स्वागत केलं जात आहे. लाडूची देखील शाळेत एन्ट्री झाली आहे. पहिल्या दिवशी शाळेत त्याचं जोरदार स्वागत झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राजवीर म्हणजे लाडू याचं खरं राजवीरसिंह रणजीत गायकवाड आहेत. राजवीरसिंह याचा जन्म २२ ऑक्टोबर २०१३ साली सांगली येथे झाला असून आता तो ४ वर्षांचा आहे. त्याचे वजन २५ किलो आहे. राजवीरसिंह यांचे वडील रणजीत गायकवाड हे प्रसिद्ध लिफ्टिंग चॅम्पियन आहेत. वेट लिफ्टिंग मध्ये त्यांनी सलग 52 राज्यस्तरीय व 10 राष्ट्रीय तसेच अनेकदा इंटरनॅशनल स्पर्धा खेळले. त्यात त्यांना अनेकदा गोल्ड मेडल हि मिळाले. त्यानंतर भारतीय सेनेत त्यांनी मानाची नोकरी पत्करली. तर आई ‘पल्लवी रणजित गायकवाड’ ह्या एम. कॉम आणि एम. बी. ए. इन फायनान्स मधून पदवीधर आहेत. काही काळ त्या सांगली जिल्हामध्यवर्ती बँकेत अकाऊंटण्ट ही आहे. पण सध्या राजीवरच्या उज्वल भविष्यासाठी कोल्हापूर येथे स्थायिक झाल्या आहेत.